सांगोला शहरातील काॅलेज परिसरात रोड रोमीयोेंचा सुळसुळाट
सांगोला / प्रतिनिधी :आॅनलाईन शिक्षण जास्त प्रभावी नसल्याने शासन निर्णया नुसार काही दिवसांपासून मुला-मुलींच्या शाळा, काॅलेजेस व महाविद्यालये सुरू झाली आहेत. कोरोना काळात काॅलेजेस बंद असल्या कारणाने काॅलेज सुरू होताच
सांगोला शहरातील एस.टी स्टॅड परिसरात, न्यु इंग्लिश स्कुल परिसरातील वासुद रोड व विद्यामंदिर ज्युनियर काॅलेज जवळील अंबिका मंदिर परिसरात रोडरोमियोंची टोळकी विनाकारण फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यामुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण शहरामध्ये वाढत आहे. आॅनलाईन शिक्षण जास्त प्रभावी नसल्याने शाळा व काॅलेज मध्ये येण्याची मुलींची संख्या जास्त असून विशेषता ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. परंतू काॅलेज सुटल्या नंतर काही टवाळखोर मुल काॅलेजच्या बाहेर तगादा लावून बसलेली असतात.
तर काही रोड रोमियो मुलींना पाहताच गाड्या उडवणे, रेस करणे, विनाकारण हाॅर्न वाजवणे अशी कृत्ये करताना दिसून येतात. अशा गोष्टी घडत असुनही दामिनी पथक व पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
यामुळे मुलींच्या शिक्षणावर फार मोठा परिणाम होत आहे. तरी संबंधित प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन कॉलेज भोवती विनाकारण फिरणाऱ्या रोडरोमियोंवर कडक कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

0 Comments