स्टाफरुममध्ये बोलावून शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा लैंगिक छळ
अल्पवयीन विद्यार्थीनीला स्टाफरूममध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील एका माध्यमिक शाळा शिक्षकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या शिक्षकाला अटक करून न्यायायालयात हजर केले.
न्यायालयाने त्याला 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. श्रीकांत बीरा मासाळ असे या शिक्षकाचे नाव असून तो मूळचा मंगळवेढा इथला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील खोपी येथील माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. यातील संशयित आरोपी हा या शाळेत कार्यरत असून त्याने याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थीनीला त्याने एकटीला स्टाफरूमध्ये बोलावून तिच्याशी लैंगिक लगट करण्याच्या प्रयत्न केला.
शिवाय याबाबत कुणाला काही सांगितलेस तर जीवे मारण्याचीही धमकी दिली. घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीने याबाबत आपल्या पालकांना सांगतिल्यावर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून त्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.
घटना गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ त्या शिक्षकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायायलासमोर त्याला हजर केले असतात न्यायालयाने त्याला 15 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

0 Comments