google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना , ओमिक्रॉनपासून सुरक्षित रहायचं का ? तर मग ' हे ' कराच

Breaking News

कोरोना , ओमिक्रॉनपासून सुरक्षित रहायचं का ? तर मग ' हे ' कराच

 कोरोना , ओमिक्रॉनपासून सुरक्षित रहायचं का ? तर मग ' हे ' कराच


शारीरिक रोगप्रतिकारक शक्‍तीसोबतच मानसिक सदृढता असल्यास कोणत्याही आजाराविरुध्दची लढाई आपण यशस्वीपणे जिंकू शकतो.



सोलापूर : कोरोनाच्या  महामारीत सर्रास कुटुंबातील किमान एकतरी व्यक्‍ती  बाधित झाला आहे तर अनेक कुटुंबातील व्यक्‍तींचा मृत्यूही झाला आहे.मात्र, शारीरिक रोगप्रतिकारक शक्‍तीसोबतच  मानसिक सदृढता असल्यास कोणत्याही आजाराविरुध्दची लढाई आपण यशस्वीपणे जिंकू शकतो. सकाळी लवकर उठून प्राणायाम करणे,



 फिरणे, आहारात दूध, फळे, ताज्या भाज्यांचा वापर केल्यास निश्‍चितपणे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, लक्षणे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळेत उपचार घ्यावेत. सोशल डिस्टन्सिंग , मास्क,सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोना  असो वा ओमिक्रॉन  यापासून बचाव होऊ शकतो.



पोलिस खात्यात काम करताना लोकांच्या सेवेनिमित्त डॉ. कडूकर या सातत्याने घराबाहेर असतात. त्यांच्या कुटुंबात दहा वर्षांचा मुलगा अभिर आणि डॉ. कडूकर यांचे वडील ईश्‍वर कडूकर, सासरे हेमंतराव पाटील, सासू मंगल पाटील असे सर्वजण एकत्र राहतात.



 कोरोनाच्या दोन लाटा संपून आता तिसऱ्या लाटेला सुरवात झाली. डॉ. कडूकर यांचे सासरे हेमंतराव यांचे (वय 71) वर्षे तर सासू मंगल यांचे (वय 66) आहे. त्यांच्या व्यायाम, आहार, विहाराच्या जुन्या सवयींमुळे त्यांची प्रकृती अजूनही ठणठणीत आहे. 



तरीही, त्यांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेतली, हे विशेष. दुसरीकडे कोरोनाच्या दोन्ही लाटेत काहीही न झालेल्या अनेकांनी गैरसमजुतीतून प्रतिबंधित लस टोचून घेतलेली नाही. घरातील काहीजणांना कोरोनाची बाधा होऊनही त्या ज्येष्ठांनी घेतलेल्या खबरदारीमुळे त्यांच्यापर्यंत कोरोना पोहचलाच नाही.



 प्रत्येकांनी अशा पध्दतीने खबरदारी, काळजी घेतल्यास निश्‍चितपणे कोरोनाचे संकट हद्दपार होऊ शकते, सर्वजण निरोगी राहू शकतो, हे त्या ज्येष्ठांनी दाखवून दिले आहे. पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांचे वडील ईश्‍वर कडूकर यांचे (वय 89) वर्षे असतानाही त्यांनी त्यांची दररोजची सवय सोडली नाही. त्यामुळेच या वयातही ते ठणठणीत आहेत.




कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांचा घाबरून मृत्यू झाला. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मन खंबीर, मनाची सदृढता असायला हवी. नियमित व्यायाम, वेळेवर जेवण, पुरेशी झोप घेतल्यास निश्‍चितपणे निरोगी राहायला मदत होते.

- डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपायुक्‍त, सोलापूर

निरोगी राहण्यासाठी...

- सायकलिंग, प्राणायाम, योगा, पायी चालण्याची हवी सवय



- कोरोनावरील प्रतिबंधित लस सर्वांनी घ्यावी; लस टोचल्यावरही कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत

- बैठे कामाला आवर घालावा; बाहेर फिरताना मास्क गरजेचाच, गर्दीत जाणे टाळा



- ताणतणाव घेऊ नये, लक्षणे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार घ्यावेत

- रोगप्रतिकारक शक्‍ती वाढेल, असे पौष्टिक पदार्थ जेवणात असू द्या (अंडी, मटन, उसळ, डाळी, दूध, हिरव्या पालेभाज्या, फळे)

Post a Comment

0 Comments