google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : ' ईव्हीएम'ला ' व्हीव्हीपॅट'च्या विश्वासार्हतेची जोड

Breaking News

सोलापूर : ' ईव्हीएम'ला ' व्हीव्हीपॅट'च्या विश्वासार्हतेची जोड

 सोलापूर : ' ईव्हीएम'ला ' व्हीव्हीपॅट'च्या विश्वासार्हतेची जोड



सोलापूर : निवडणुकीतील बॅलेट पेपरचा वापर २००९ च्या निवडणुकीपासून बंद झाला आणि मतदानासाठी इलेक्‍शन व्होटिंग मशीनचा (ईव्हिएम) वापर होऊ लागला. त्यानंतर अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला. 


मतदारांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आता 'व्हीव्हीपॅट'चा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे मतदारांच्या मनातील गैरसमज दूर होऊन मतदानाची टक्‍केवारी वाढीसाठी त्याची मदत झाली आहे. आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही त्याचा वापर केला जाणार आहे.


सोलापूर जिल्ह्यात १८ वर्षांवरील मतदारांची संख्या ३५ लाख ७२ हजार ७९२ आहे. २६ जानेवारी १९५० रोजी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजेच्या हाती सत्तेची चावी असतानाही आतापर्यंत कधीच १०० टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावलेला नाही, हे विशेष. 


त्यामुळे मागील ७३ वर्षांपासून दरवर्षी मतदार जनजागृतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही, मतदानाची टक्‍केवारी १०० टक्‍क्‍यांपर्यंत आलेली नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानाचा टक्‍का सर्वाधिक राहिला आहे. दरम्यान, ईव्हीएमच्या माध्यमातून केलेले मतदान त्याच उमेदवाराला (राजकीय पक्षाला) पडत नाही,


 असा गैरसमज मतदारांच्या मनातून पूर्णपणे दूर झालेला नाही. त्यासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा 'व्हीव्हीपॅट'चा वापर झाला. त्यामुळे मतदाराला त्याने केलेले मतदान पहायची संधी उपलब्ध झाली. त्याची पावती (चिठ्ठी) संबंधित मतदाराला पहायला मिळते. त्यामुळे मतदानाची टक्‍केवारी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

जिल्ह्यात ३५.७२ लाख मतदार


जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमधील मतदारांची संख्या ३५ लाख ७२ हजार ७९२ आहे. त्यात १८ लाख ६४ हजार ६७६ पुरुष तर १७ लाख सात हजार ९३७ महिला मतदार आहेत. मतदारांच्या संख्येत अक्‍कलकोट अव्वल असून या तालुक्‍यात सर्वाधिक (तीन लाख ५६ हजार ४५९) 


तर दुसऱ्या क्रमांकावर पंढरपूर तालुक्‍यात तीन लाख ४९ हजार १५९ मतदार आहेत. त्यानंतर माढा तालुक्‍यात तीन लाख ३१ हजार ७३६ तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात तीन लाख ३१ हजार पाच मतदार आहेत. उर्वरित तालुक्‍यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत.


लोकसभा, विधानसभेच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी अधिक असते. मतदानाची टक्‍केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. तरुण आणि महिला मतदारांची संख्या वाढली आहे.


- भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

Post a Comment

0 Comments