google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एक्सयुव्ही कारच्या भीषण अपघातात सावंगी मेडिकलचे सात विद्यार्थी ठार -

Breaking News

एक्सयुव्ही कारच्या भीषण अपघातात सावंगी मेडिकलचे सात विद्यार्थी ठार -

 एक्सयुव्ही कारच्या भीषण अपघातात सावंगी मेडिकलचे सात विद्यार्थी ठार -



सेलसुरा नदीच्या पुलाला धडक देऊन अपघातग्रस्त वाहन ४० फूट खोल खाईत पडले


 नजीकच्या सेलसुरा नदीच्या पुलावर एक्सयुव्ही ५०० कारला भीषण अपघात होऊन यामध्ये सावंगी मेडिकल कॉलेजचे सात विद्यार्थी जागीच ठार झाले. हे सर्व जण १९ ते २५ वर्ष वयोगटातील एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी असून सावंगी मेडिकल कॉलेजच्या होस्टेल वर राहत होते. ही घटना सोमवारचे मध्यरात्री एक वाजताचे सुमारास घडल्याने एकच हाहाकार माजला. या पुलावरील चार पदरी रस्त्याला दोन भागात विभागणाऱ्या १८ फूट लांबीच्या सिमेंट काँक्रीट च्या भिंतीला जबर धडक देऊन तसेच भिंत तोडून हे वाहन ४० फूट खोल नदीपात्रात पडले.


फिर्यादी विजय देविदास खैरे राहणार, बोरगाव मेघे यांचे माहितीवरून ही घटना उजेडात आली. सदर वाहन चारपदरी रस्त्याच्या मध्यभागी खोल खाईत अडचणीच्या ठिकाणी पडल्यामुळे मृतकाची शहनिशा करणे कठीण होते. त्यामुळे सेलसुरा गावातून जेसीबी बोलावून या वाहनाला बाहेर काढून ओळख पटविण्यात आली.



मिळालेल्या माहितीवरून एमबीबीएस अभासक्रमाचे सर्व विद्यार्थी घटनेच्या दिवशी मित्राच्या बोलावण्यावरून यवतमाळ येथे ओडी २३ बी १११७ या क्रमांकाच्या एक्सयुव्ही ५०० या कारने गेले होते. सोमवारचे मध्यरात्री जेवण करून परत येत असताना त्यांची भरधाव कार नदीच्या पुलावरील भिंतीवर आढळून खोल खाईत पडली. या भीषण अपघातात नीरज चव्हाण २२, गोरखपूर युपी, आविष्कार विजय रहांगडले २१ गोंदिया, 


नितेश सिंग २५ ओडीसा, विवेक नंदन २३, गया बिहार, प्रत्युश सिंग हरेंद्रसिंग २३, गोरखपूर युपी, शुभम जयस्वाल २३, दीनदयाल उपाध्याय नगर यूपी व पवन शक्ती १९ राह. गया बिहार यांचा समावेश आहे. हा अपघात अतिशय भीषण असल्याने गाडीतील मृतकांना मंगळवारचे पहाटेपर्यंत बाहेर काढण्यात आले. सावंगी पोलिसांनी ही कारवाई केली.


-: प्रतिक्रिया :-

अपघातग्रस्त गाडीतील सर्व मृतक सावंगी मेडिकल कॉलेज च्या हॉस्टेल चे विद्यार्थी होते. या सर्वांना दररोज दूध, कॉफी पुरविण्याचे काम करीत असल्याने त्यांची चांगली ओळख होती. नितेश सिंग हा ओडीसाच्या राजकीय घराण्यातील मोठया व्यक्तीचा मुलगा असून अपघातग्रस्त वाहन त्याचेच होते. त्यांच्या परीक्षा नुकत्याच संपल्याने हे सर्व जण बाहेर गेले होते.

                                              सुनील भोयर, सावंगी……!


-: प्रतिक्रिया :-

चारपदरी रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर सेलसुरा पुलावरचा हा पहिला व सर्वात मोठा भीषण अपघात आहे. सव्वाशे ते दीडशे च्या वेगात ही गाडी पुलाचे भिंतीला धडकल्याचा अंदाज आहे. या अपघाताची माहिती गावकऱ्यांना काही वेळातच मिळाली होती.

                                              नितीन वैद्य, सेलसुरा…..!

-: प्रतिक्रिया :-

या अपघाताची माहिती पोलीस पाटलाला मिळाल्यानंतर गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील जेसीबी पाठवून खोल खाईत अडकलेल्या गाडीला बाहेर काढण्यात आले. मृतकाची ओळख तसेच त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केली. सिमेंट काँक्रिटची जाड भिंत तोडून झालेला अपघात अतिशय भीषण होता.

                                                 जगदीश येसनकर…..!

: खासदार रामदास तडस यांची घटनास्थळी भेट :

सेलसुरा पुलावरील भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खासदार रामदास तडस यांनी मंगळवारी घटनास्थळी धाव घेतली. मेडिकलच्या मृतक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माहिती जाणून घेतली. या मृतकामध्ये तिरोडा 


(गोंदिया) विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार विजय रहागंडाले यांचा मुलगा आविष्कार यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे या घटनेची तसेच या संदर्भात होत असलेल्या कारवाईची माहिती खासदार रामदास तडस यांनी त्यांच्या कुटुंबियांना करून दिली.

Post a Comment

0 Comments