500 चौ फुटा पर्यंत सरसकट मालमत्ता करात सूट..!राज्य सरकारचा मोठा निर्णय..!
मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. यानुसार मुंबईतील ५०० चौरस फुटांप
र्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिली. तसेच हा क्रांतीकारी निर्णय असून राज्यातच नाही, तर देशातही असा निर्णय घेण्याचं धाडस कुणी केलं नसल्याचं नमूद केलं. ते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास विभागाला मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना सरसकट सर्वांना मालमत्ता कर माफ करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हा क्रांतीकारी निर्णय आहे. असा निर्णय घेण्याचं धाडस राज्यातच नाही तर देशातही कुणी केलं नसेन. मुंबई आणि शिवसेना हे नातं कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. मुंबईकरांनी नेहमीच भरभरून प्रेम केलं आहे.
0 Comments