गौडवाडी मध्ये गुळीग समाजाच्या वतीने माणसातलं माणूसपण हरवलेलं पुन्हा जागृत करण्यासाठी एक धडपड
गौडवाडी येथे गुळीग समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आगळा वेगळा भव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी माजी सैनिक व आदर्श पुरस्कारप्राप्त केलेले मान्यवर तसेच विविध सामाजिक क्षेत्रात उल्लखनीय काम
केलेल्या सर्व मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार घेण्यात आला.या कार्यक्रमामध्ये राजेंद्र गुळीग यांनी प्रास्ताविक करत असताना कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगून कार्यक्रमास सुरुवात केली. गेली दोन वर्ष कोरोना काळामध्ये आपली कामगिरी बजावणाऱ्या अरोग्य, वैद्यकीय विभागातीय तसेच राजकीय,
सामाजिक,सांस्कृतिक,साहित्तिक आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन या कार्यक्रमच्या निमित्ताने केले होते.तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी समाजातील जेष्ट नागरिक श्री विठ्ठल सोमा गुळीग याची संयोजकाच्या वतीने निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सरपंच उपसरपंच,पोलिसपाटील तसेच बार असोसियेशन उपाध्यक्ष,आरोग्यअधिकारी तलाठी व पत्रकार निमंत्रित आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सेवा निवृत्त अधिकारी, कर्मचारी माझी सैनिक तसेच आरोग्य विभागातील पदाधिकारी व आशावर्कर्स शैक्षणिक विभागातील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते
व अंगणवाडी सेविका आणि कायदे सल्लागार व मदतनीस तसेच ग्रामपंचायत मधील पदाधिकारी व होतकरू कर्मचारी तसेच विविध समित्या मध्ये नवीन पदभार स्वीकारलेल्या व साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कवी लेखक तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी यांचा भव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. माणिकराव सकट यांनी केले यानंतर कार्यक्रमामध्ये मा अड.सुनिताताई धनवडे यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांनी स्वतः चा खडतर संघर्षमय प्रवास तसेच समाजातील युवा पीडिला कायद्याविषयी माहिती देवून त्यांना प्रोत्साहित केले.
तसेच माजी सैनिक उज्वलकुमार गुळीग यांनी कुठुंबापासून दूर राहून देशाबद्दल असणारी आत्मीयता व भावी पिडीमध्ये नवीन जवान तयार होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून आपला संपूर्ण जीवनप्रवास मनोगतामध्ये कथन केला यांनतर मा.डेप्युटी कलेक्टर तानाजी कांबळे( नाना ) सेवा निवृत्ती नंतरचे जीवन कथन केले.
बाल कवी मा.फारूक काझी सर यांनी कोरोना काळात शिक्षणाची झालेली दुर्दशा व विध्यार्थामध्ये शैक्षणिक व सर्वांगीण विकास कसा होईल यावरती त्यंनी योग्य ते मार्गदर्शन केले.तासगाव तालुका शहर अध्यक्ष मा.शिवाजीराव गुळवे यांनी आपल्या समाजाबद्दलची त्यांच्या मनामध्ये असलेली तळमळ मनोगतातून व्यक्त केली.यानंतर सन्मान साहित्याचा युवा कवी लेखक वाचक समूह
महारष्ट्र राज्य या समूहाचे समूह प्रशासक व पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनेरिंग कॉलेजचे विध्यार्थी सुप्रसिद्ध युवा कवी तुषार पोपट गुळीग यांनी सामाजिक विषयावरील वास्तववादी कविता सादर करून उपस्थितामध्ये योग्य प्रबोधन केले. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रमाचा सर्वे सर्वा मा.संतोष गुळीग(सर )यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाचे आयोजक गुळीग समाज व समाजातील कार्यकर्ते आणि तंटा मुक्ती प्रसार माध्यम शशिकांत हातेकर,पोपट गुळीग,अमोल गुळीग,तंटा मुक्ती उपाध्यक्ष दत्ताराजे गुळीग,शिवाजी गुळीगसर ,दशरथ गुळीग,राहुल गुळीग,जितेंद्र गुळीग आबासो गुळीग विशाल हातेकर,गणेश गुळीग आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments