जि.प.प्राथ.शाळा,चांडोलेवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजाराम मेटकरी तर उपाध्यक्षपदी शिवाजी गुसाळे यांची निवड
सांगोला दि.1:--सांगोला शहरातील जि. प.प्राथ.शाळा,चांडोलेवाडीच्या शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्गठन सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.अध्यक्षपदी तरुण कार्यकर्ते राजाराम बिरा मेटकरी तर उपाध्यक्षपदी शिवाजी उत्तम गुसाळे(सर) यांची एकमताने निवड करण्यात आली.सदस्यपदी नंदू बजरंग मेटकरी,उत्तम भाऊसो.सरगर,बाळू दशरथ चांडोले,हणमंत मधुकर कपडेकर, रघुनाथ
आण्णासो.केदार,ज्योती शंकर चांडोले,वर्षा अनिल बुरांडे, आश्विनी नागेश चांडोले,मैना सुरेश सरगर,राणी दत्तात्रय चांडोले,रुपाली सुधीर चांडोले तर शिक्षण प्रेमी सदस्यपदी प्रभाकर यशवंत सरगर,शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ.नंदा शिंदे यांची निवड करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था तथा नगरपालिका प्रतिनिधी सदस्यपद रिक्त ठेवण्यात आले.
नूतन अध्यक्ष यांनी शाळेस सर्वोतोपरी सहकार्य करु असे सांगितले व शाळेच्या अडचणी दूर करू. उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी शाळेस मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी अध्यक्ष उत्तम सरगर व माजी अध्यक्ष महादेव कोळेकर व उमेश चांडोले यांनी विशेष सहकार्य केले.पालक, शिक्षक व निवडलेली समिती यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करू असा निर्धार सर्वांनी केला.
यावेळी जेष्ठ नागरिक मधुकर कपडेकर, गोरख केदार,सोमनाथ मेटकरी,संतोष मेटकरी,शुभांगी चांडोले,लक्ष्मी चांडोले,सुषमा चांडोले,रेखा बालाजी टकले, सुरेखा टकले,अश्विनी सागर चांडोले,सुवर्णा चांडोले,वर्षा मेटकरीआदी पालक उपस्थित होते.सदस्य निवडीची माहिती व निकष मुख्याध्यापक अंकुश गडदे यांनी वाचून दाखविले.आभार व सत्कारास सहकार्य संजय काळे सर यांनी केले.याप्रसंगी शिक्षक दत्तात्रय काशीद,आनंदा जगताप,विजय नवले,शांताबाई काशीद आदीनी सहकार्य केले.
0 Comments