पुण्यात 25 वर्षीय वहिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ केला सावत्र दीरानं शूट , त्यानंतर धमकी देऊन बलात्कार ; हिंजवडी परिसरातील घटना
महिलेचा अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हिंजवडी परिसरात घडला आहे.याप्रकरणी सावत्र दिरावर हिंजवडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 मध्ये घडला आहे.
याप्रकरणी पीडित 25 वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी (दि.15) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा सावत्र दीर आहे. फिर्यादीचे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी आरोपीने दिली. तसेच फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याशी जबरदस्ती करुन शारीरिक सबंध केले. फिर्यादीचे अंघोळ करण्याचे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली.
हा प्रकार 16 डिसेंबर 2021 रोजी दुपारी तीनच्या सुमारास व 4 ते 5 दिवसांनी घडली. फिर्यादीने लाजे पोटी व समाजात नाव बदनाम होईल या भीतीने तक्रार दिली नाही. त्यानंतर पतीसह पोलीस ठाणे गाठून त्यांनी याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खारगे करीत आहेत.
0 Comments