google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रलंबित असलेल्या शेततळ्यांचे सुमारे १ कोटी ८९ लाख रूपयांचे अनुदान तालुका कृषी कार्यालयाकडे प्राप्त : आ. शहाजीबापू पाटील

Breaking News

प्रलंबित असलेल्या शेततळ्यांचे सुमारे १ कोटी ८९ लाख रूपयांचे अनुदान तालुका कृषी कार्यालयाकडे प्राप्त : आ. शहाजीबापू पाटील

 प्रलंबित असलेल्या शेततळ्यांचे सुमारे १ कोटी ८९ लाख रूपयांचे अनुदान तालुका कृषी कार्यालयाकडे प्राप्त : आ. शहाजीबापू पाटील 


लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार

सांगोला (प्रतिनिधी) : ‘मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत सांगोला तालुक्यातील काम पूर्ण झालेल्या व प्रलंबित असलेल्या ४०२ शेतकऱ्यांच्या शेततळ्याचे सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये प्रलंबित अनुदान शासनाकडून सांगोला तालुका कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर अनुदान वितरित ( जमा ) केले जाणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.


शासनाच्या कृषी खात्या मार्फत मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत सन २०१९ व २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत तालुक्यातील ४०२ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. शेततळी पूर्ण झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सचिव साठी सांगोला तालुका कृषी कार्यालयाकडे सादर केली होती मात्र शासन स्तरावरून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते दरम्यान राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे अजनाळे ता. सांगोला येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांना शेततळ्याच्या प्रलंबित अनुदानाविषयी निवेदन देऊन तात्काळ अनुदान जमा करण्याची मागणी केली होती मंत्री दादाजी भुसे यांनी खास बाब म्हणून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानासाठी तातडीने निर्णय घेऊन ४०२ शेतकऱ्यांच्या शेततळ्याचे सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये अनुदान सांगोला कृषी कार्यालयाकडे वर्ग केले आहे.


याच दौऱ्यात आमदार पाटील यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी सबसिडी जाहीर करावी अशी मागणी मेळाव्यात त्यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना ड्रॉन फ्रुट लागवडीसाठी ४० टक्के सबसिडी जाहीर केल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments