google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयात साने गुरुजी यांची जयंती साजरी

Breaking News

विज्ञान महाविद्यालयात साने गुरुजी यांची जयंती साजरी

 विज्ञान महाविद्यालयात साने गुरुजी यांची जयंती साजरी



                विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला साने गुरुजी यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथराव फुले, प्रा. अशोक वाकडे, प्रा. अविनाश लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.




                   प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथराव फुले साने गुरुजी यांना अभिवादन करताना म्हणतात की, श्यामची आई या एकाच पुस्तकाने समाजाला संस्कार धन देणारे साने गुरुजी जगात एकमेव आदर्शवादी व्यक्तिमत्व होय. लहान व कोवळ्या मुलांच्या मनावर ती आईच्या संस्काराची किती आवश्यकता असते ते संस्कार मुलांना पुढे आयुष्यात किती उपयोगी ठरू शकतात हे श्यामची आई या पुस्तकाने सिद्ध केले आहे. साने गुरुजी हे लेखक विचारवंत व अभ्यासक होते. त्यांनी विद्वत्तेच्या जोरावर समाजाला प्रेरक व पोषक विचारतील ते विचार आत्मसात करणे आज काळाची गरज आहे त्यांचे विचार आत्मसात करणे म्हणजेच साने गुरुजी यांना अभिवादन केल्यासारखे आहे.



                  प्रा. अशोक वाकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना साने गुरुजी यांचे चरित्र व त्या चरित्रातून त्यांनी केलेल्या संस्काराचे विवेचन अत्यंत मार्मिक शब्दात स्पष्ट केले व साने गुरुजी यांचे विचार विद्यार्थ्यांनी का आत्मसात करणे गरजेचे आहे हे त्यांनी श्यामची आई या पुस्तकातून स्पष्ट केले.



      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नियोजित समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दिपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. अविनाश लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला.

Post a Comment

0 Comments