google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांना राजस्तरीय पुरस्कार जाहीर......

Breaking News

सांगोला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांना राजस्तरीय पुरस्कार जाहीर......

 सांगोला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांना राजस्तरीय पुरस्कार जाहीर......


         दि 22जाने 2022रोजी नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे दुसरे राजस्तरीय अधिवेशन मौजे नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर या ठिकाणी पार पडणार आहे या अधिवेशनास ऊर्जा मंत्री नामदार नितिन राऊत साहेब उपस्थित राहणार आहेत..



   या अधिवेशनात मंत्रिमंहोदयांच्या उपस्थित सांगोला महावितरणचे कार्यशील कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अभियंता . आनंद पवार साहेबांच्या आजवरच्या प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे..

     आनंद पवार हे 2009 पासून महावितरण सेवे मध्ये रुजू आहेत या अगोदर त्यांनी बारामती भूम   जेजुरी या भागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


            महावितरण उपकार्यकारी आनंद पवार यांनी सांगोला येथे पदभार स्वीकारल्या नंतर सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे या मध्ये त्यांनी तालुक्यातील पन्नास हुन अधिक ग्रामपंचायतीना स्वतंत्र रोहित्र बसविले आहेत तसेच त्यांच्या कार्यकाळात प्रथमच त्यांनी पोलीस स्टेशन पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय सांगोला न्यायालय या सारख्या महत्वाच्या ठिकाणी स्वतंत्र रोहित्र बसवले आहेत तसचे तालुक्यातील शेती व इतर ग्राहकांसाठी पंधराशे हुन अधिक रोहित्र बसविले आहेत 13383नवीन वीज जोडणी केली आहे..



   तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना ही अतिशय प्रभाविपणे तालुक्यात राबिवली आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेने त्यांना समाजभूषण हा पुरस्कार जाहीर केला आहे अशी माहिती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे यांनी सांगितले...

    तालुक्यातुन सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments