सांगोल्यात कोविड नियमांचे उल्लंघन ; 2 हॉटेलसह कापड दुकान सील
राज्यात एकीकडे ओमिक्रोनची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिक निर्धास्तपणे कोविड नियमांचे उल्लंघन करत फिरतात . सांगोल्यात महसूल पोलीस व नगरविकास विभागाने एकत्रित कारवाई करत शहरातील 2 हॉटेल 1 कापड दुकान सील केले . तर राष्ट्रीयकृत बँकेत अधिकाऱ्यांना समज दिल्याची माहिती अभिजित पाटील यांनी दिली .
नागरिक सहजपणे नियमांचे उल्लंघन करत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सांगोला महसूल , नगर विकास व पोलीस विभागाच्या संयुक्तपणे दुकानांवर कारवाई करण्यात आली . तहसीलदार अभिजीत पाटील , पोलिस निरीक्षक सुहास जगताप व नगरपालिकेचे अधिकारी यांनी एकत्रित शहरातील हॉटेल , किराणा , ज्वेलर्स , कापड अशा विविध दुकानात जाऊन नियमांचे उल्लंघन केलेल्यांना दंड आकारला .
तसेच 2 हॉटेल कापड दुकानही सील करण्यात आले . युनियन बँकेमध्ये कोविड नियमांचे पालन होत नसल्याने तेथील अधिकाऱ्यांना समज देण्यात आला . हॉटेल दुकानांमध्ये व्यापाऱ्यांची किंवा तेथील कर्मचाऱ्यांचे 2 डोस पूर्ण झाले नसतील , त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचे 2 डोस पूर्ण झाले नसतील ,
ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचे 2 डोस पूर्ण झाले नसतील , सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन होत नसेल अशा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे .
0 Comments