सांगोला महूद चौकात मालट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू
सांगोला/ प्रतिनिधी:- बेजबाबदारीने रोडच्या परिस्थितीकडे न पाहता चालकाने मालट्रक चालववित वृद्धमहिलेस धडक दिल्याने गंभीर जखमी झालेली महिला उपचारा दरम्यान मयत पावली आहे.
सदरची घटना दि. 23 रोजी सकाळी १०.३५ च्या सुमारास अहिल्यादेवी चौक सांगोला येथे घडली असून अंजुबाई नामदेव टकले वय 62 रा. बेहरे चिंचोली ता सांगोला असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की अंजुबाई नामदेव टकले रा बेहरे चिंचोली ता सांगोला या बँकेतून पैसे काढण्या करिता सांगोला शहरात आल्या होत्या.यावेळी शिवणे कडून येणारा मालट्रक क्र एम एच 26 ए डी 9766 या ट्रकच्या चालकाने रोडच्या परिस्थितीकडे न पाहता अंजुबाई टकले याना जोराची धडक दिली.
या अपघातातील महिलेस गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ सांगोला येथील लवटे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
परंतु उपचारादरम्यान सायंकाळी ६ वाजता त्यांचा सांगली येथे मृत्यू झाला.याबाबत सुभाष नामदेव टकले यांने सांगोला पोलिसात ट्रक चालक ब्रह्मजी व्यंकटी वाघमारे रा आलूवडगाव ता नायगाव जि नांदेड याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

0 Comments