google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरात बनावट किसान छाप तंबाखू तोट्याचे रॅकेट सापडले ; पहा मास्टर माईंड कोण?

Breaking News

सोलापूरात बनावट किसान छाप तंबाखू तोट्याचे रॅकेट सापडले ; पहा मास्टर माईंड कोण?

 सोलापूरात बनावट किसान छाप तंबाखू तोट्याचे रॅकेट सापडले ; पहा मास्टर माईंड कोण?



सोलापूर : पी पी पटेल अँड तंबाखू या कंपनीचे बनावट किसान छाप तंबाखू तोटे विक्री करणारी टोळी पकडण्यात आली असून 5 जणांविरुद्ध जेलरोड पोलीस (Jail Road Police Thane) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरात अचानक कंपनीच्या तोट्याची विक्री का कमी झाली याची तपासणी केली असता हे रॅकेट सापडले.



पी पी पटेल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मोहम्मद हुसेन चौधरी वय ४० वर्षे रा- बी. ५७४, डॉ आंबेडकर चाळ, महाराणा प्रताप नगर, धारावी मुंबई यांनी याप्रकरणी सोलापुरात येऊन फिर्याद दिली.



१) कन्हैया मनोहरलाल तोलानी वय ४० वर्षे रा ८/२ नवजीवन हौसिंग सोसा, मिलीट्री कॅन्टीजवळ, २) सोहेल मोहम्मद हनीफ धोटेकर वय २६ वर्षे रा ८७३, शास्त्रीनगर, भगतसींग चौक, ३) सर्फराज कय्युम बागवान वय ३८ वर्षे, रा १२२/१२३ सिध्देश्वर पेठ काडादी चाळ, ४) आरिफ अब्दुल मुनाफ सय्यद वय ३७ वर्षे रा १३, श्रेयस नगर, आसरा चौक, मुलतानी बेकरीसमोर सोलापूर, ५) कपिल श्रेयस प्रभावळकर वय ३२ वर्षे रा स्वागत नगर, ताई चौक, केंगनाळकर विटभट्टीजवळ, सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.



सोलापुरात नोव्हेंबर महिन्यात अचानक किसान छाप तंबाखू तोट्याची विक्री कमी झाली, कंपनीने मार्केट मध्ये सर्व्हे केला असता त्यांना तर तोटे विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही तोटे कंपनीने माल तपासणी करण्यासाठी नेला असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले, मात्र विक्री कोण करतंय हे समजले नाही, तेव्हा पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना कंपनीने पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांना तपास लागल्यावर त्यांनी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मोहम्मद हुसेन चौधरी यांना फिर्याद देण्यास सांगितले. यामध्ये आरोपी कपिल प्रभावळकर हा मास्टर माईंड असून तोच बनावट माल बनवतो, त्यांच्या घरी छापा टाकला असता दोन पोते माल मिळाला तो सर्फराज कय्युम बागवान याला धरून माल बाजारात एजन्सीला देतो. कन्हैया मनोहरलाल तोलानी  व सोहेल मोहम्मद हनीफ धोटेकर यांच्या एजन्सीमधून बनावट तोटे पान टपऱ्यांवर विक्री होत होते.




 पी. पी. पटेल या कंपनीची फसवणुक करून एकुण २०८ नकली तंबाखुचे पुडे आपल्या ताब्यात ठेवून कॉपीराईटच्या स्वामीत्वाचे मुळ हक्काचे उल्लघंन केले व पी.पी.पटेल या कंपनीची फसवणुक केली आहे त्यांच्यावर भादंविसंक ४२०,३४,१०९ कॉपीराईट का ५१.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोटेकर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments