google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला कोणता पेपर होणार..?

Breaking News

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला कोणता पेपर होणार..?

 दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला कोणता पेपर होणार..?



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रकही आज (ता. 21) जाहीर करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.



गेल्या वर्षी कोरोनामुळे परीक्षा झालेली नसली, तरी यंदा बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे. तसचे दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहे. आता बोर्डाने प्रत्येक विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.



वेळापत्रक कुठे पाहायचे..?

बारावीची परीक्षा (लेखी) 4 मार्च 2022 पासून ते बुधवार 30 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे.



कोविडच्या ओमायक्रोन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे परीक्षा होतील की नाही, याबाबत विद्यार्थी-पालकांच्या मनात संभ्रम होता. मात्र, कोविड नियमांचे पालन करुन यंदा परीक्षा होणार असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.



‘ओमायक्रोन’संदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून यंदा दहावी-बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेय..

Post a Comment

0 Comments