संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
विज्ञान महाविद्यालय सांगोला. येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रघुनाथ राव फुले, नियोजित समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे, प्रा. डॉ. जगन्नाथराव ठोंबरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. दीपक रिटे म्हणाले की संत गाडगेबाबा यांचे कार्य व कर्तुत्व समाजाला व तरुण पिढीला निश्चितच दिशा देणारे व त्यांच्या मनामध्ये समाजसेवा वृत्त धारण करायला लावणारी आहे.
तेव्हा आज शरीरशुद्धी बरोबरच मनाची शुध्दी होऊन ही काळाची गरज आहे. आपण मनाने स्वच्छ झाल्याशिवाय स्वातंत्र्य , समता, बंधुता, न्याय या भावनेने वागू शकणार नाही तेव्हा संत गाडगेबाबा यांचे विचार व कार्य आत्मसात करणे हे खूप गरजेचे आहे त्याशिवाय खऱ्या अर्थाने समाजसुधारणा होणार नाही. विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा आबा यांचे चरित्र व विचार प्रेरणास्थानी मानून आपल्या जगण्याला ला नकार दिला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रघुनाथ राव फुले आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये स्पष्ट करतात की संत गाडगेबाबा यांचे विचार समाजाला प्रेरक आहेत. तेव्हा त्यांचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये समाजसेवेचे वृत्त धारण केले पाहिजे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करून फक्त त्यांच्या स्मृती जागृत होणार नाहीत तर त्यांचे विचार, आठवणी, कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तरच त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन केले असे म्हणू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. अशोक कांबळे यांनी मानले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

0 Comments