google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्राचार्य विजयकुमार आदर्श मुख्याध्यापक वाघमोडे यांना पुरस्कार जाहीर

Breaking News

प्राचार्य विजयकुमार आदर्श मुख्याध्यापक वाघमोडे यांना पुरस्कार जाहीर

 प्राचार्य विजयकुमार आदर्श मुख्याध्यापक वाघमोडे यांना पुरस्कार जाहीर


शिवणे ( वार्ताहर ) : - जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान , बीड या नामांकित सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा आदर्श मुख्याध्यापक शिक्षक रत्न पुरस्कार शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री विजयकुमार वाघमोडे यांना जाहीर झाला आहे . सदर संस्थेतर्फे राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कार देऊन गौरविले जाते .



 या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा . राजेंद्र गाडेकर , संचालक प्रा . भगवान माने , डॉ.राजू शिंदे , चंद्रकांत भोंडवे , प्रा . डॉ . सत्यनारायण ढवळे , प्रा . रेखा निर्मल , तन्वीर पठाण , प्रा , बिभीषण घायाळ यांनी सांगितले . हा पुरस्कार मिळाले बद्दल प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांचे संस्था अध्यक्ष बबनराव जानकर , उपाध्यक्ष प्रकाश वाघमोडे , सचिव डॉ . राजेंद्र जानकर , व सर्व संचालक मंडळ तसेच पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ . बाबासाहेब देशमुख व शिक्षण क्षेत्रातील सर्वानी अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments