शरीरसौष्ठव स्पर्धेत संकेत काळे प्रथम
शालेय जीवनापासून शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डोंगरगाव ता.सांगोला येथील संकेत संजय काळे या खेळाडूने श्रीरामपूर येथे झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या वतीने चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर येथे आंतरविभागीय वेटलिफ्टिंग व शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ज्यु. महाराष्ट्र श्री., नॅशनल चॅम्पियन बॉडीबिल्डर संकेत काळे याने उत्तम कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी संकेत काळे ने विठ्ठलराव बुट्टेपाटील सभागृह राजगुरू महाविद्यालय राजगुरू येथे १६ डिसेंबर रोजी 'आंतरमहाविद्यालयीन' किताब पटकावला होता. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

0 Comments