बालकांना पोलिओ ऐवजी कावीळची लस ; बेलाटी आरोग्य उपकेंद्रावरील प्रकार ; सीईओ स्वामींनी घेतली तात्काळ दखल
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावातील आरोग्य उपकेंद्र वरील आरोग्यसेविका शिंदे यांनी पोलिओ ऐवजी बालकांना काविळीची लस दिली यापूर्वी काविळीची लस देण्यात आली होती. डबल वेळा लस दिली गेल्याने बालकांना त्रास होऊ लागला, त्याची रिएक्शन झाली, एक बाळ बेशुद्ध पडलं, तीन बाळांना ताप आला, एकूण सात बालकांना या ठिकाणी लसीकरण झाले होते.
नागरिकांनी जेव्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सातही बालकांना ताबडतोब सोलापूर शहरातील डॉक्टर कुलकर्णी यांच्या चिरायू रुग्णालयात हलवण्यात आले अशी माहिती उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगार यांनी दिली.
याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना रात्री नऊच्या सुमारास माहिती मिळाली असता त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्वरित त्यांनी सर्व प्रकरणाची चौकशी केली, डॉक्टरांशी चर्चा केली, सर्व बालके सुखरूप असल्याचं त्यांनी सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव मध्ये लसीकरणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई झाली पुन्हा तिला कामावर घेण्यात आले मात्र मयत झालेल्या बालकाच्या आई-वडिलांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही या शासकीय मदतीसाठी ते कायम जिल्हा परिषदेला चक्कर मारतात मात्र कुणीही दखल घेत नाही हे दुर्दैव आहे.

0 Comments