ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदेंना पक्षाकडून मोठी संधी ; या पदावर नियुक्ती
सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांना पुन्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशवर मोठी संधी मिळाली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांच्या निवडी केल्या त्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांची प्रदेश प्रवक्ता पदावर नियुक्ती केली आहे या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी गुरुवार 16 डिसेंबर रोजी काढले या निवडीबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून आमदार प्रणिती शिंदे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments