सोलापूर जिल्ह्यातील ' या ' गावच्या सरपंचांना धाडल्या नोटिसा ; तुमचे सरपंच पद का रद्द करू नये ? पटापट बघा सर्व गावांची नावे
कोरोना लसीकरणात निरुत्साह दाखविणाऱ्या गावातील सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.
येत्या तीन दिवसांत खुलासा द्या, अन्यथा सरपंचपद रद्द करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 39 अ नुसार (कर्तव्यात कसूर करणे) कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसवर सरपंच काय खुलासा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. कोरोना व ओमिक्रॉनच्या संकटापासून सोलापूर जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन युद्ध पातळीवर तयारीला लागले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोना लसीकरणासाठी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात कमी लसीकरण असलेल्या गावांमधील सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजाविण्यात आली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी नगर, नंदूर, बठाण, रहाटेवाडी, मानेवाडी,
करमाळा तालुक्यातील उंदरगाव, धायखिंडी, बिटरगाव श्री, पोंधवडी, बिटरगाव वां.,
दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर, फताटेवाडी, शिरवळ, वडजी, वळसंग, बार्शी तालुक्यातील भानसाळे, वालवड, चिंचोली, मालेगाव, मांडेगाव,
माढा तालुक्यातील माळेगाव, वडोली, गार अकोले, दहिवली, व्होळे, माळशिरस तालुक्यातील शंकरनगर, तोंडले, खळवे, महाळुंग, हनुमान वाडी,
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर, हैद्रा, मिरजगी, पितापूर, बुऱ्हाणपूर, सांगोला तालुक्यातील नरळेवाडी, निजामपूर, आगलावेवाडी, हटकर मंगेवाडी, धायटी,
उत्तर सोलापूर तालुक्यातील राळेरास, गावडी दारफळ, कवठे, वांगी, अकोलेकाटी या गावांचा समावेश आहे.
पंढरपूर तालुक्यातील आंबेचिंचोली, विटे, गोपाळपूर, तन्हाळी, सांगवी, मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगाव, टाकळी सिकंदर, शेटफळ, वटवटे, अर्जुनसोंड ही गावे कोरोना लसीकरणात सर्वात कमी आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे शंभर टक्के कोरोना लसीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामस्थांचाही सहभाग त्यामध्ये आवश्यक आहे.
लसीकरणात पिछाडीवर असलेल्या पाच गावांच्या सरपंचांना नोनोट
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना लसीकरणात पिछाडीवर असलेल्या पाच गावांच्या सरपंचांना नोटीस देण्याची सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. - दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

0 Comments