google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 टेंभुर्णी येथे कर्जाच्या पैशाला तगादा लावल्याने सलून व्यवसायिकाची आत्महत्या

Breaking News

टेंभुर्णी येथे कर्जाच्या पैशाला तगादा लावल्याने सलून व्यवसायिकाची आत्महत्या

 टेंभुर्णी येथे कर्जाच्या पैशाला तगादा लावल्याने सलून व्यवसायिकाची आत्महत्या


टेंभुर्णी येथील व्यवसायकाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून      आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सुर्ली रोड टेंभुर्णी तेथे  घडली आहे.



याविषयी टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी वर्षा कासवेद हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती खंडू महादेव कासवेद याने सौदागर वसंत साळुंखे (रा. बायपास रोड टेंभुर्णी) व दिलीप कृष्णा गोरे (रा. पंढरपूर) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. मृत्य इसम खंडू कासवेद याने सौदागर साळुंखे याचे ७००००० रूपये व दिलीप गोरे याचे  ५००००० रूपये व्याजासह परत करून देखील राहिलेल्या 50 हजार रूपयांसाठी हे सावकार वारंवार घरी येऊन



शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे या सगळ्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सौदागर साळुंखे व दिलीप गोरे या दोन सावकारांविरूध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोनाली पवार या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments