google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दोन अल्पवयीन मुलींवर 74 वर्षाच्या म्हाताऱ्याने केली बळजबरी ; वृद्धाच्या कुकर्माचे दोन दिवसांनी फुटले बिंग

Breaking News

दोन अल्पवयीन मुलींवर 74 वर्षाच्या म्हाताऱ्याने केली बळजबरी ; वृद्धाच्या कुकर्माचे दोन दिवसांनी फुटले बिंग

 दोन अल्पवयीन मुलींवर 74 वर्षाच्या म्हाताऱ्याने केली बळजबरी ; वृद्धाच्या कुकर्माचे दोन दिवसांनी फुटले बिंग  



एका ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना १७ डिसेंबरला नागभीड तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे घडली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे.



पांडुरंग लवाजी बावणे (७४) असे या आरोपीचे नाव आहे.आरोपीने गावाशेजारील बोरे वेचत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने जवळच असलेल्या एका घरात नेऊन बळजबरी केली. याबद्दल कुणाला सांगितले तर मारण्याची धमकी दिली.म्हाताऱ्याने हे चाळे ज्या घरात केले तेव्हा त्याच घरात दुसरी एक मुलगी जेवण करीत होती. त्या मुलीवरही या म्हाताऱ्याने वक्रदृष्टी टाकली. तिच्यावरही त्याने अत्याचार केला.



पीडित मुली दोन-तीन दिवस अबोल होत्या.मुलीसोबत काहीतरी घडले असावे, वडिलांना असा संशय आला. मुलीची आई यावेळी बाहेरगावी गेली होती. मुलीच्या आईला सोमवारी गावी बोलावले असता मुलीने आईजवळ सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी नागभीड पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार नोंदवली.



प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (१ए), ३७६ (एबी), ५०६ सहकलम ४, ६,१० बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आर. बी. मेढे, सपोनि पूनम पाटील करीत आहेत.

Post a Comment

0 Comments