google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिलासादायक ! ‘या’ लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी

Breaking News

दिलासादायक ! ‘या’ लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी

दिलासादायक ! ‘या’ लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी



मुंबई : कॉरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंट जगभरात भूमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. आपल्या देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडत आहेत. यावर उपाय म्हणून लसीकरण जलत गतीने केले जात आहे.


फायझर कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 टक्के प्रभावी आहे. असे एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असे इस्त्रायलमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे.


‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते.


संशोधनात सहभागी 8,43,208 लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता, तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली.


क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस आणि इस्रायलच्या बेन – गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझरच्या कोविड लसीचा बूस्टर (तिसरा) डोस कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.


फायझरही जगातील सर्वाच मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक असून अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी आहे. सुमारे 47.644 अब्ज डॉलर सह 2020 मध्ये फॉर्च्युन 500 च्या यादीत या कंपनीला 64 वे स्थान मिळाले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय मॅनहॅटनमध्ये आहे.


या लशीच्या माध्यमातून मानवी शरीरात mRNA सोडले जातात. हे एक जनेटिक मटेरियल असून ते शरीरातील पेशींना विषाणूचं प्रोटिन ओळखण्यास मदत करतात आणि सक्रिय होतात. जर विषाणूचा संसर्ग झाला तर अँटिबॉडी कशा तयार करायच्या हे ते शरीराला शिकवते. विषाणूने हल्ला केल्यानंतर शरीरातील पेशी तो ओळखतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते.

Post a Comment

0 Comments