दोन डोस पूर्ण असल्याशिवाय कोणालाही बँक , मॉल , प्रवास , शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही तहसिलदार अभिजीत पाटील
सांगोला / प्रतिनिधी : ओमिक्रोन व कोनाच्या तिसया लाटे पासून सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांनी प्रशासकीय नियमांचे पालन करावे , यासह सांगोला तालुक्यातील नागरिकांचे तिसऱ्या लाटे पासून संरक्षण करण्यासाठी आणि कोरोना लसीकरण प्रभावीपणे वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय , बाजार समित्या , बँका , सर्व शॉपिंग मॉल , वाहतूक व्यवस्था इ . शासकीय कार्यालयामध्ये संपूर्ण लसीकरण म्हणजेच दोन डोस पूर्ण
असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही . नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगोला तालुक्यातील नागरिकांना केले आहे . तसेच ओमिक्रोन व कोरोना महामारी च्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावे अन्यथा मास्क न वापरल्यास संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल .
तसेच सांगोला शहर व तालुक्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये किंवा बँकांमध्ये संपूर्ण लसीकरण पूर्ण झाले नसलेल्या संबंधित व्यक्तीला प्रवेश दिल्यास त्या अस्थापनेवरही कारवाई करण्यात येईल . असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशानुसार तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगोला शहरवासियांना केले आहे

0 Comments