सोलापूर शहरात रुग्णवाहिकेचे आता हे आहेत दर
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ०१/१२/२०२१ पासून रुग्णवाहिका व शववाहिका यांचे नवीन दर सर्वसाधारण सभा यांच्या मंजुरीनुसार लागू करण्यात आले आहे. IDH हॉस्पिटलमध्ये सोलापूर महानगरपालिकेकडील एकूण १२ रुग्णवाहिका व ४ शववाहिका १ कैलास रथ आहेत.Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे गेले २ वर्ष अनेक अडचणींना सामोरे जात असताना व ओमायक्रोन हा नवीन व्हायरस जगात धुमाकूळ घालत असताना केंद्रशासन व राज्यशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार Covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून १ शववाहिका,१रुग्णवाहिका,मा.आमदार सुभाष देशमुख यांच्या निधीतून १ शववाहिका, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्या निधीतून १ रुग्णवाहिका ,१ शववाहिका नगरसेवक रवी कय्यावाले यांच्या भांडवली निधीतून १ रुग्णवाहिका, नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या भांडवली निधीमधून १ रुग्णवाहिका शहर व शहराबाहेर गरजू लोकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांच्या आवाक्यात हे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार मग ते दाराकडून १८ कंत्राटी वाहन चालक IDH हॉस्पिटल येथे रुजू झालेले आहेत.
तरी सामान्य नागरिकांचे विचार करून RTO ने निश्चित केलेल्या दराच्या तुलनेने कमी दर आकारले आहेत. सदर रुग्णवाहिका व शववाहिका राज्याबाहेर सुद्धा सेवा देण्यात येणार आहे.तरी गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे उपआयुक्त धनराज पांडे यांनी केले.
रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध करून घेणेकामी संपर्क क्रमांक -०२१७ – २३२३७०० मोबाइल नंबर ७७९८५३१८५५ मोबाईल नंबर ९७६६३७४५६६

0 Comments