मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच कार्यकर्ती : सोनंद ग्रामपंचायतच्या नूतन सदस्या रंजना बाबर यांचा खुलासा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिपकआबा व शहाजीबापू यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार : ग्रा.पं.सदस्य रंजना बाबर
सांगोला : प्रतिनिधी सोनंद ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मी जरी, ग्रामीण विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले असले तरीही, मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला कार्यकर्ता असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळात आमचे नेते मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत राहणार असल्याचा खुलासा सोनंद ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्या सौ. रंजना केशव बाबर यांनी केला.
नुतन ग्रामपंचायत सदस्या सौ. रंजना बाबर यांचा राष्ट्रवादी भवन सांगोला येथे मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी हा खुलासा केला. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, श्रीरंग बाबर, जिल्हा परिषदेचे सभापती अनिल मोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काशीद, प्रदेश संघटक प्रवीण पाटील, संजय काशीद, डिकसळ गावचे सरपंच चंद्रकांत कारंडे, प्रकाश काशीद, साहेबराव काशीद, केशव बाबर, आनंदराव काशीद,शरद बाबर, संगीता बाबर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी कामगार पक्ष सह अन्य समविचारी गटांची आघाडी करण्यात आली होती. आघाडीच्या माध्यमातून पूर्वी निवडणुका झाल्याने पोट निवडणुकीतही आघाडीतील अन्य पक्ष व नेतेमंडळींनी आपणास निवडणुकीत सहकार्य केले आहे. सोनंद गावचे सरपंच समाधान पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत, त्यांनीही आपल्याला पोटनिवडणुकीत मदत केली आहे. आपण पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सक्रीय कार्यकर्ता आहोत आणि सदैव राहू निवडणुकीच्या निकालानंतर काही माध्यमात खोडसाळपणे आपण अन्य पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्या असल्याचे भासविण्यात आले आहे
परंतु आपला इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नाही सोनंद गावच्या राजकारणात आपण मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करू असेही यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्या सौ. रंजना केशव बाबर यांनी जाहीर केले.
0 Comments