google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश सोलापूर जिल्ह्यात असे राहणार निर्बंध

Breaking News

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश सोलापूर जिल्ह्यात असे राहणार निर्बंध

 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश सोलापूर जिल्ह्यात असे राहणार निर्बंध



ओमिक्रोन नव्या वायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत त्यामध्ये विशेष करून रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये काही निर्बंध लागू करण्यात आले असून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागात खालीलप्रमाणे निर्बंध लागू केले आहेत. कोन्हीड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.





ज्याअर्थी, युरोप तसेच युएसएमध्ये ओमायक्रॉन कोविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुपट वेगाने वाढत आहे. जगातील १९० देशामध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असल्याने तसेच राज्यात देखील गेल्या दोन दिवसांत एक हजारापेक्षा जास्त रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नविन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरीक्त निर्बंध लावण्याचे शासनाने निदेशीत केलेले आहे.



ज्याअर्थी, शासनाकडील वाचा क्र. ५ मधील दि. २४.१२.२०२१ नुसार कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या समारंभामध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध लागू केलेले आहेत.



त्याअर्थी, मी मिलिंद शंभरकर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना (कोव्हिड १९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरुन सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून) दि. २५.१२.२०२१ चे रात्री ००.०० पासून खालीलप्रमाणे निर्बंध लागू राहतील.



a. b. नाताळ सणाच्या अनुषंगाने शासन गृह विभाग यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-१२२१/प्र.क्र.२८०/ १ब दि. २३.१२.२०२१ अन्वये दिलेले निर्देश लागू राहतील. विशा लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.



C. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या बंदीस्त ठिकाणी १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.



d. उपरोक्त नमूद कार्यक्रमांव्यतिरिक्त बंदीस्त ठिकाणी स्थायी स्वरूपाची बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी संबंधीत प्राधिकरणाकडून अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसेल तसेच ज्याठिकाणों स्थायी स्वरूपाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त नसेल इतक्या उपस्थितीस व खुल्या जागेत संबंधीत प्राधिकरणाकडून अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त नसेल इतक्या उपस्थितस परवानगी असेल.



c. क्रिडा स्पर्धा, खेळांचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.f. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात उपस्थितांची संख्या किती असावी याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे निश्चित करतील. असे करताना दि. २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.



उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या आस्थापना धारकांनी त्यांचे परवानानुसार अनुद्येय असलेली त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल,



h. संपूर्ण जिल्हयात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.



i. सदर आदेशात स्पष्टपणे समावेश नसलेल्या उपक्रमांबाबत स्थानिक परिस्थीतीनुसार अधिक निर्बंध लावणेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे निर्णय घेऊ शकतील. मात्र असेल निर्णय घेणेपूर्वी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबतची पुर्व सूचना जाहीर करणे आवश्यक राहील.



J.सदर आदेशामध्ये अंर्तभुत असलेले निबंध स्थानिक परिस्थीतीनुसार अधिक कठोर करावयाचे झाल्यास त्याबाबतचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असतील. सदर आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरीक्त इतर विषयांबाबत शासनाकडील दिनांक २७.११.२०२१ नुसार निर्बंध लागू राहतील.

Post a Comment

0 Comments