अंगावर पेट्रोल टाकून जाळून खून ; आरोपी पिता-पुत्रास जन्मठेपेची शिक्षा ;काय आहे प्रकरण
सोलापूर : सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांनी आरोपी सत्यनारायण मदनलाल करवा, वय ५७ वर्षे व आरोपी मनोज सत्यनारायण करवा, वय-३४ वर्षे रा. वर्धमान नगर, रुपाभवानी रोड, भवानी पेठ, सोलापूर यांना हनुमान घनशाम शर्मा याचा अंगावर पेट्रोल टाकून जाळून खून केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे दोषी धरण्यात आले व जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की, दिनांक २१/०१/२०१७ रोजी सकाळी ०७:१५ वा. सुमारास यातील मयत हनूमान घनशाम शर्मा रा. महाराजगंज गौलीगुडा चमन, हैद्राबाद हे त्यांचे एमसीएक्स •व्यवहारातील पंधरा लाख रुपये मागण्याकरीता यातील आरोपी नामे सत्यनारायण करवा यांचे घरी गेले असता मयताने आरोपींना "माझे एमसीएक्स व्यवहारातील पंधरा लाख रुपये परत दया, मला दुस-यांना दयावयाचे आहेत असे म्हणाला त्यावेळी आरोपी सत्यनारायण करवा याने मी तुला ओळखत नाही, तु माझे घरात आलाच कसा, माझा काही संबंध नाही, तु इथून गेला नाहीस तर, माझा मुलगा पोलीस मेंबर आहे. त्याला सांगुन तुझ्यावर केस करायला लावीन" असे म्हणाला. त्यावर मयत हनूमान शर्मा याने आरोपीस "काही तरी पैसे दया नाहीतर मला मरावे लागेल असे म्हणून सोबत नेलेली बाटली बाहेर काढली व स्वःतच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करु लागला, त्याचवेळी मयत हनूमान शर्मा याने एका हातात लायटर दाखवला तेवढयात आरोपी व आरोपीचा मुलगा समोर आले आरोपी सत्यनारायण करवा मयत हनुमान शर्मा याला "तु काय मरतो आम्ही तुला दाखवतो कसे मरायचे ते" असे म्हणून दोन्ही आरोपींनी मयताचे हातातील पेट्रोलची बाटली घेवून मयताच्या अंगावर ओतली व मयाताशी झोंबाझोंबी करुन मयताचे हातातील लायटर घेवून मयतास पेटवून दिले.
त्यानंतर मयत हनुमान शर्मा आरडाओरडा करीत असताना आरोपींनी मयतास विझवण्याचा प्रयत्न करु लागले असता त्यांना देखील भाजले. यातील मयत हनुमान शर्मा यांना दि. (२१/०१/२०१७ रोजी सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर येथे उपचारा करीता दाखल केले होते. यातील आरोपींनी मयताच्या अंगावर पेट्रोल ओतून मयतास पेटवून देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु दिनांक २३/०२/२०१७ रोजी सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर येथून मयतास पुढील उपचाराकरीता सुर्या हॉस्पीटल, पुणे येथे दाखल केले होत. तेथून दिनांक ३०/०१/२०१७ रोजी नमूद मतास ओस्मानीया जनरल हॉस्पीटल, हैद्राबाद येथे उपचाराकरीता दाखल केले असता दिनांक ३१/०९/२०१७ रोजी उपचारा दरम्यान हनुमान शर्मा हे मयत झाले होते. यातील आरोपींनी मयताच्या अंगावर पेट्रोल ओतून हनुमान शर्मा याचा खुन केला आहे
तसेच यातील आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने मयताचा एच.पी. कंपनीचा लॅपटॉप व विंडोज कंपनीचा मोबाईल यांची विल्हेवाट लावली होती. सदर प्रकरणी जोडभावी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता पोलीसांनी आरोपींच्या विरुध्द भा.दं.वि. नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयात ०७ साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात वैदयकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा व मयताचे तीन मृत्युपूर्व जबाब या सर्व गोष्टींवरुन सदर आरोपींनी मिळून मयताच्या अंगावर पेट्रोल ओतून हनुमान शर्मा याचा खुन केला आहे. खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे व ते सिध्द केल्याचे युक्तीवादात सांगण्यात आले सदरचा जिल्हा सरकारी वकील प्रदिप् सिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आजरोजी यातील आरोपी सत्यनारायणमदनलाल करवा व मनोज सत्यनारायण करवा यांना खुनाचे अपराधाखाली दोषी धरण्यात आले.
या प्रकरणात न्यायालयात आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी होवून सदर आरोपींना खुनाच्या अपराधाखाली जन्मठेपेची सुनावली आहे. या कामी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांनी ग्राहय धरून खून केल्याप्रकरणी आरोपी क्रं. १) सत्यनारायण मदनलाल करवा व आरोपी क्रं. २) मनोज सत्यनारायण करवा भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु.२०००/- दंडाची शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
तसेच मयताच्या प्रत्येक वारसदारास नुकसानभरपाई म्हणून आरोपींकडून प्रत्येकी रु. १,००,०००/- देण्याचा आदेश पारीत झाला आहे. सदर मयतास त्याची पनि रुपा हनुमान शर्मा तसेच मुलगा अभिषेक व मुलगी सुष्मीता असे तीन कायदेशीर वारस असल्याने एकुण तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई आरोपींनी सदर मयताचे वारसास दयावी लागणार आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले. तर आरोपी क्रं. 1 व २ च्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक बी. एच पाटील यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून महिला पो. ना. अनुराधा गुत्तीकोंडा बक्कल नं. ९३३ व रफिक तांबोळी बक्कल नं. १७९४ यांनी काम पाहिले आहे.

0 Comments