google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आणखी चार महिने 5 किलो मोफत रेशन

Breaking News

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आणखी चार महिने 5 किलो मोफत रेशन

  मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आणखी चार महिने 5 किलो मोफत रेशन


केंद्रातील मोदी सरकारने  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच  मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतातील शिधापत्रिकाधारकांना एक मोठा दिलासा आहे.


केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या  ग्रामीण भागातील एकूण 27 लाख 11 हजार 159 तर पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 12 लाख 69 हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्रतिव्यक्तीला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. यातील तांदूळ आणि गहू चांगल्या दर्जाचा मिळाला आहे,’ अशी माहिती पुणे शहर अन्न-धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले  यांनी सांगितले आहे.


पुढे सचिन ढोले  म्हणाले, ‘भारतीय अन्न महामंडळाकडून चांगले सहकार्य मिळत आहे. या महिन्यातही रेशनवरील गहू आणि तांदूळ चांगल्या दर्जाचे मिळाले आहेत. पुणे शहरासाठी जवळपास 12,600 मेट्रिक टन इतका तांदूळ आणि गहू चालू महिन्यात मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील जवळपास 94.5 टक्के वाटप केले आहे. तर, पुणे, पिंपरी शहरात काही अपंग, आजारी नागरिक आहेत. त्याचबरोबर काहींना विविध कारणास्तव धान्य घेता येत नाही अथवा प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकानांपर्यंत येणे शक्य होत नाही. अशा सर्व नागरिकांना घरपोच धान्य पुरवण्याची व्यवस्था केली आहे.

Post a Comment

0 Comments