google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाविकास आघाडीच्या आंदोलनाला मोठे यश आम. शहाजीबापू पाटील व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तालुक्यातील वीज पुरवठा पूर्ववत

Breaking News

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला मोठे यश आम. शहाजीबापू पाटील व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तालुक्यातील वीज पुरवठा पूर्ववत

 महाविकास आघाडीच्या आंदोलनाला मोठे यश

आम. शहाजीबापू पाटील व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तालुक्यातील वीज पुरवठा पूर्ववत

सांगोला : तालुका प्रतिनिधी ऐन रब्बी हंगामात कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण प्रशासनाविरोधात आम. शहाजीबापू पाटील व मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरण प्रशासनाने आपली भूमिका बदलत तात्काळ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला. तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांची ज्वलंत भावना लक्षात घेऊन आमदार शहाजीबापू व मा.आम. दिपकआबा यांनी बुधवार दि 24 रोजी सांगोला येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधवांची संतप्त भावना लक्षात घेऊन महावितरणचे उपअभियंता आनंद पवार यांनी तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले व तात्काळ कार्यवाही सुरू केली.


यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, शिवसेना तालुकाप्रमुख सुर्यकांत घाडगे, उप तालुका प्रमुख अरविंद केदार, शहरप्रमुख कमरुद्दीन खातीब, गोविंद आण्णा जरे, संजय देशमुख, युवा नेते दिग्विजय पाटील, सागर पाटील, सुभाष इंगोले, दादा घाडगे, गुंडा दादा खटकाळे, डी एस सावंत, संजय मेटकरी, रवींद्र कदम, महेंद्रकुमार बाजारे, जगदीश पाटील, प्रताप घाडगे, राजू मेटकरी, दादासाहेब लवटे, शहाजी घाडगे, दादा वाघमोडे, शंकर मेटकरी, दत्ता खरात, के.टी पवार, गणेश लवटे, अरुण बिले, विकास मोहिते, प्रा. वासुदेव वलेकर, दत्ता बंडगर अजित गोडसे आदी पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थकित वीज बिलांची वसुली करण्यासाठी महावितरण प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कृषिपंपांची विज खंडित करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांत तीव्र असंतोष निर्माण झाला होता. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत न केल्यास महावितरण कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच दिला होता. त्यानंतर, लगेचच आमदार शहाजीबापू पाटील व मा.आम.  दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या विषयावर एकत्रित येऊन आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरण प्रशासनाला नरमाईची भूमिका घ्यावी लागली. तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या एकजुटी समोर प्रशासनाने माघार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत असूनही तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आमदार शहाजीबापू पाटील व मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्रित येऊन प्रसंगी रस्त्यावर उतरून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांता समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments