शेतीपंपाच्या वसुलीस अत्यल्प प्रतिसादामुळे सांगोला तालुक्यात वीज कनेक्शन तोडणी मोहिम तीव्र होणार - श्री आनंद दा . पवार
राज्यात महावितरणची थकबाकी 73 हजार कोटीवर जाउन पोहचली आहे त्यात शेतीपंपाची थकबाकी 45 हजार कोटी झाली आहे . सांगोला तालुक्यातील 34 हजार ग्राहकांकडे 266 कोटी रूपये थकबाकी व चालु बिल 60 कोटी रूपये अशी एकूण 326 कोटी थकबाकी आहे . महावितरणची 50 % ते 66 % वीज बिल माफीची योजना मार्च 2022 अखेर पर्यंतच लागू असल्याने ग्राहकांनी आत्तापासून टप्प्या टप्प्याने रक्कम भरून मार्च 22 पर्यंत आपले वीज बिल कोरे करावे .
तसेच वीज बिल भरलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्यात येईल . तरी महावितरणच्या आव्हानाला शेतीपंप ग्राहकांनी बिल भरण्यास अल्यल्प प्रतिसाद दिल्याने वीज कनेक्शन तोडण्याशिवाय पर्याय उरला नसल्याने महावितरण तर्फे उदयापासून शेतीपंप वीज कनेक्शन तोडणी मोहिम तीव्र गतीने राबविण्यात येणार आहे . तरी सर्व ग्राहकांना आव्हान करण्यात येते की , त्यांनी आपले शेतीपंपाचे वीज बिल भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे .
0 Comments