google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग : सोलापुरात पोलीस प्रशासनाचे नवे आदेश ; मिरवणुका व सभांवर बंदी

Breaking News

ब्रेकींग : सोलापुरात पोलीस प्रशासनाचे नवे आदेश ; मिरवणुका व सभांवर बंदी

 ब्रेकींग : सोलापुरात पोलीस प्रशासनाचे नवे आदेश ; मिरवणुका व सभांवर बंदी



सोलापूर : सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. तसेच सोलापूर शहरात छोटया मोठ्या कारणावरून सभा, संपप आंदोलने, निदर्शने इ. होत असतात. तसेच सोलापूर शहरात आगामी काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व कोवीड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव व नुकतेच मराठा आरक्षण ओ.बी. सी. आरक्षण, पेट्रोल, डिझेल, गॅस, ई. दरवाढ/ महागाई इत्यादी मुळे जनमानसात नाराजी पसरली आहे. या दृष्टीकोनातून मोर्चे, निदर्शने विरोध आंदोलने इ. च्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक आहेत अशी माझी खात्री झाली आहे.




त्या अर्थी मी बापू बांगर पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/ विशा), सोलापूर शहर, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील ३७ (३) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दिनांक ३०/११/२०२१ रोजीचे ००:०१ वाजले पासुन ते दिनांक १४/१२/२०२१ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील असा आदेश देत आहे.


हा आदेश लग्न, अंत्ययात्रा इ. लागू असणार नाही. तसेच मिरवणूका, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदन धरणे, सभा  सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन केला असेल, त्यांना लागू होणार नाही हा आदेश दिनांक ३०/११/२०२१ रोजी रात्री ००:०१ वाजले पासुन ते दिनांक १४/१२/२०२१ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमलात राहील. सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्यानिशी दिला आहे. सदर आदेशामुळे कोविड-१९ चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास बाधा येणार नाही किंवा न्यूनतीकरण करणार नाही.

Post a Comment

0 Comments