google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवारी राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव

Breaking News

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवारी राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव

 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवारी राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव


सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवार 20 नोव्हेंबर रोजी राज भवनामध्ये राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव होणार आहे.


देशातील माध्यम क्षेत्रात नावाजलेल्या नवभारत ग्रुपच्या वतीने राज्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा "नवभारत गव्हर्नन्स अवार्ड 2021" या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. त्यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा समावेश आहे. हा सोहळा शनिवार 20 नोव्हेंबर रोजी राजभवनामध्ये सायंकाळी चारच्या सुमारास होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे.


सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डिसेंबर 2019 मध्ये जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. केवळ तीन महिन्यातच कोरोना महामारीची सुरुवात झाली. या जागतिक महामारीच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोना गंभीर असतानाही सोलापूरच्या खंबीर जिल्हाधिकाऱ्यांनी काम केले. 


त्यांना कोरोनाची दोनदा लागण झाली, परिवार सोबत नसतानाही ते निडर राहिले. कोरोनामध्ये कामकाज करताना प्रशासनाची चांगले सहकार्य मिळाले. 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली, या लाटेत मात्र प्रशासनाची चांगलीच कसोटी लागली. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता, बेडची उपलब्धता या सर्व बाबींवर प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची जबाबदारी मोठी होती. 


चोवीस तासांपैकी वीस-वीस तास प्रशासन काम करत होतं, सोलापुरातील नागरिकांना वाचवण्यासाठी जिवाच रान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलं, ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून रोजच्यारोज काळजी घेण्यात आली या लाटेतून अखेर सोलापूर बाहेर पडले. आज बर्‍यापैकी लसीकरण झाल्याने रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. याचे श्रेय निश्चितच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाच जाते. या संवेदनशील अधिकाऱ्याचा शनिवारी राजभवनात गौरव होतोय ते त्या पुरस्कारास निश्चितच पात्र आहेत.

Post a Comment

0 Comments