एसपी तेजस्वी सातपुते यांना राज्यपालांच्या हस्ते मिळणार नवभारत गव्हर्नन्स ' पुरस्कार
"सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते "नवभारत गव्हर्नन्स अवार्ड" पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे".
शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मुंबईतील राजभवनात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार असून महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा समावेश आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा एसपी म्हणून पदभार घेतला .कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातपोलीस प्रशासनाने अतिशय उत्तम काम केले, स्वतः सातपुते या कोरोना बाधित झाल्या मात्र वर्क फ्रॉम होमद्वारे त्यांनी शासकीय सेवा सुरूच ठेवली . सोलापूर जिल्ह्यात काम करताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन' ने अनेकांना अवैध धंद्यापासून दूर करून स्वतःच्या चांगल्या व्यवसायाकडे वळवले. याची राज्यभरात चर्चा आहे. विशेष करून हातभट्टी काढणार्यांचे परिवर्तन झाले.
0 Comments