google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या 176 जागांसाठी पोटनिवडणूक ; 21 डिसेंबरला मतदान ; पहा कसा आहे कार्यक्रम

Breaking News

जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या 176 जागांसाठी पोटनिवडणूक ; 21 डिसेंबरला मतदान ; पहा कसा आहे कार्यक्रम

जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या 176 जागांसाठी पोटनिवडणूक ; 21 डिसेंबरला मतदान ; पहा कसा आहे कार्यक्रम 


 सोलापूर जिल्ह्यातील 148 गावातील  ग्रामपंचायत सदस्यांच्या 176 जागा रिक्त झाल्या होत्या त्या 176 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली असून 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे नोटिफिकेशन बुधवार 17 नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. 176 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे....


1 नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक २२/११/२०२१ (सोमवार) पर्यंत


2 तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २२/११/२०२१ (सोमवार)


3 नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ३०/११/२०२१ (मंगळवार) ते दिनांक ०६/१२/२०२१ (सोमवार) वेळ सकाळी ११.०० ते दु. ३.००


4 नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ०७/१२/२०२१ (मंगळवार) वेळ सकाळी ११.०० वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत


5 नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ०९/१२/२०२१ ( गुरुवार) दुपारी ३.०० वा. पर्यंत


6 निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ ०९/१२/२०२५ (गुरुवार) दुपारी ३.०० वा. नंतर


7 आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक २१/१२/२०२१ (मंगळवार) सकाळी ७.३० वा. पासून ते सायं. ५.३० वा. पर्यंत 


8 मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील दिनांक २२/१२/२०२१ (बुधवार)


9 जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक २७/१२/२०२१ (सोमवार)

Post a Comment

0 Comments