google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संजय गांधी निराधार योजनेची अकराशे प्रकरणे रद्द : खंडू तात्या सातपुते | तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून गोरगरिबांच्या अन्नात माती कालवली

Breaking News

संजय गांधी निराधार योजनेची अकराशे प्रकरणे रद्द : खंडू तात्या सातपुते | तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून गोरगरिबांच्या अन्नात माती कालवली

 संजय गांधी निराधार योजनेची अकराशे प्रकरणे रद्द : खंडू तात्या सातपुते | तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून गोरगरिबांच्या अन्नात माती कालवली


सांगोला / निखिल काटे संजय गांधी निराधार योजनेची ११०० प्रकरणे तहसील कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांनी रद्द केली आहेत . त्यामुळे सर्व स्तरावरून या गोष्टीकडे राग व्यक्त केला जात आहे . निराधारांना जगण्यासाठी ही मदत त्यांना मिळत होती . पण तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून या संजय गांधी निराधार योजनेची अकराशे प्रकरणे रद्द करून गोरगरिबांच्या अन्नामध्ये माती कालवणचा प्रकार सांगोला  


तहसील मध्ये उघडकीस आला असल्याची माहिती आरपीआय अध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांनी दिली आहे . गोरगरीब , सर्वसामान्य निराधारांना जगण्यासाठी ही मदत त्यांना मिळत होती . त्यामुळेच त्यांचे जीवन व्यवस्थित रित्या चालत असते . परंतु तहसील कार्यालयाचे नियम दाखवून व त्रुटी काढून अकराशे प्रकरणी रद्द केली आहेत . ही प्रकरणे मंजूर करताना २०१ ९ च्या वेळेस प्रशासनास नियम व अटी दिसल्या नाहीत का ? त्या वेळी. 


संजय गांधी निराधार योजना तालुक्याला समितीला प्रशासनाने मजुरी कशी दिली आहे . हा चर्चेचा विषय बनलेला आहे . यामुळे साधारणपणे ११ लाख रुपये इतका निधी कमी मिळणार आहे . आणि अजूनही अधिकारीवर्ग त्रुटी काढून राहिलेली प्रकरणे रद्द करण्याच्या मार्गावर आहेत . या गंभीर बाबीकडे तहसीलदार यांनी निराधारांना आधार देण्याऐवजी , दिलासा देण्याऐवजी पाठ फिरविल्याचे चित्र सध्या सांगोला तहसील कार्यालयामध्ये पहावयास मिळत आहे .

Post a Comment

0 Comments