विज्ञान महाविद्यालयामध्ये महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ रघुनाथराव फुले समितीचे चेअरमन प्रा डॉ दीपक रिटे सैन्य दलातील सेवक माजी विद्यार्थी अमर गायकवाड यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य रघुनाथ फुले यांनी समग्र महात्मा फुले यांचे जीवन चरित्र व त्यांचे असलेले सामाजिक कार्य स्पष्ट करून आज समाजाला शोषित वंचित समाजाला महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचे नितांत गरज असल्याचे स्पष्ट केले महात्मा फुले यांनी सर्वसामान्य माणसासाठी शिक्षणाचे सर्व पर्याय खुले करून दिले यामुळेच आज तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेऊन ताठ मानेने जगत आहे तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जगले पाहिजे त्यांचा विचार आत्मसात केला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला
समितीचे चेअरमन प्रा डॉ दीपक रिटे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाला एन सी सी चे सर्व विद्यार्थी अमर गायकवाड भजनावळे काका स्वप्नील शिंदे प्रा अशोक वाकडे प्रा लोखंडे सर ज्येष्ठ प्राध्यापक आबासाहेब इंगवले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आभार प्रा अशोक काकडे यांनी मानले
0 Comments