सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी अपघाताचे बनाव करून लुटणा - या दरोडेखोरांना ४८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या मालकाच्या नातेवाईकाने दिली टिप
सोलापूर ग्रामीण एल . सी . बी . व सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी अपघाताचे बनाव करून लुटणा - या दरोडेखोरांना ४८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या मालकाच्या नातेवाईकाने दिली टिप , गुन्हयातील ९ २५ ग्रॅम , ५६० मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीटसह एकूण ४५ लाख ८१ हजार ५२२ रू . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक ०८/११/२०२१ रोजी सकाळी ९ : ३० वा . च्या सुमारास यातील फिर्यादी सुशांत बापूसो वाघमारे , वय २२ वर्षे , रा . दिघंची ता . आटपाडी , जि . सांगली यांना त्यांचे मालक विजय काटकर यांनी फिर्यादीला बोलावून घेवून त्यांचेकडील जूने सोने देवून
सांगोला येथील महाकाली टंचचे दुकानात जावून ते दागिने गाळून शुध्द करून त्याचे बिस्कीट करून आणणेकामी सांगितल्याने फिर्यादी व त्याचा मित्र असे दोघेजण मोटार सायकलवरून सांगोला येथील महाकाली टंचचे दुकानात येवून त्यांना जुने सोने वितळून त्याचे बिस्कीट बनवून देणेकामी दिले होते .
त्याप्रमाणे सोन्याचे बिस्कीट बनवून दिल्या नंतर ते दोघे सायंकाळी ७:३० वा . च्या सुमारास परत मोटार सायकलवरून दिघंची ता . आटपाडी कडे जाण्याकरीता निघाले . तेंव्हा फिर्यादी व त्याचा मित्र हे रात्री ८:३० वा . च्या सुमारास मौजे एकतपूर ते आचकदाणी जाणारे रोडवर फॉरेस्टजवळील बागलवाडी शिवारात आले असता त्यांचे पाठीमागून एक अनोळखी चारचाकी गाडी भरधाव वेगात येवून फिर्यादीचे मोटार सायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने फिर्यादी व त्याचा मित्र दोघेही रस्त्याचे कडेला असलेल्या चारीत जावून पडल्याने गंभीर जखमी झाले . त्यावेळी धडक दिलेले चारचाकी वाहन ही सुध्दा रोडच्याकडेला चारीत जावून पडले .
त्यानंतर चारचाकी वाहनातून दोघेजण बाहेर येवून फिर्यादीला हाताने व दगडाने मारहाण करून त्यांचेजवळील मोबाईल फोन काढून घेवून फिर्यादीचे खिशात असलेले सोन्याचे बिस्कीट जबरदस्तीने काढून घेवून त्यांचेकडील वाहन पेटवून देवून निघून गेले म्हणून यातील फिर्यादी याने दिलेल्या तक्रारीवरून
सांगोला पोलीस ठाणे गुं.र.न. १३ ९ ४ / २०२१ भा.द.वि.सं.का.क ३ ९ ४,३ ९ ७ , २७ ९ , ४२७ प्रमाणे दिनांक १०/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरच गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा . पोलीस अधीक्षक श्रीमती . तेजस्वी सातपुते मॅडम , अपर पोलीस अधीक्षक श्री . हिंमत जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील , मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकामी विशेष पथक नेमणेबाबत सुचना दिल्या होत्या . त्यानुसार गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील व पोनि सुहास जगताप यांनी एक संयुक्त पथक तयार करून , पथकास सदरचा गुन्हा फिर्यादी अगर त्याचा मित्र यांनी प्लॅन करून केला आहे अगर कसे ?
याबाबत माहिती काढण्याबाबत व गुन्हयात वापरलेले वाहनमालकाचा शोध घेवून तपास करणेबाबत सुचना दिल्या . त्यानुसार नेमलेले संयुक्त पथक गुन्हेगारांच्या मागावर असताना माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा फिर्यादीचा मित्र हा त्याचे गांवाकडील मित्राच्या मार्फतीने प्लॅन करून गुन्हा करण्यासाठी मिरज येथील दोन इसमांची मदत घेवून गुन्हा केला असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली . त्यावरून पथक मिरज येथे जावून त्याबाबत माहिती घेतली असता गुन्हयातील संशयित इसम हे मिरज शहरात एका वाईनशॉप जवळ थांबले
असल्याबाबत माहिती मिळाल्याने , त्यांना तात्काळ ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले असल्याचे सांगून आरोपीचा मित्र व गुन्हयातील जखमी यांचे सांगणेवरून सदर गुन्हा केल्याचे सांगून गुन्हयातील चोरलेले ९ २५ ग्रॅम , ५६० मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असा एकूण ४५ लाख ८१ हजार ५२२ रू . किंमतीचा मुद्देमाल आरोपींनी काढून दिला तो जप्त करण्यात आला आहे .
गुन्हयात ताब्यात घेतलेल्या मिरज येथील इसमांकडे अधिक चौकशी केली असता , त्यातील एक इसम हा सांगली येथील होमगार्ड असून तो व्यसनाधिन आहे . तसेच दुसरा हा इलेक्ट्रॉनिक दुकानात सेल्समन म्हणून कामास असून त्यास शेअर मार्केट मध्ये मोठ्याप्रमाणात तोटा झाल्याने तो कर्जबाजारी झाल्याने त्यामुळे त्याने त्याचे मित्राच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले . सदर गुन्हयाचा पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे सपोनि नागेश यमगर हे करीत आहेत .
सदरची कामगिरी ही मा . पोलीस अधीक्षक श्रीमती . तेजस्वी सातपुते , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . हिंमत जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मंगळवेढा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . सर्जेराव पाटील , व सांगोला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली , सांगोला पोलीस ठाणेचे सपोनि नागेश यमगर , गुन्हे शाखेचे सफौ ख्वाजा मुजावर , श्रीकांत गायकवाड , पोलीस अंमलदार नारायण गोलेकर , मोहन मनसावाले , चालक समीर शेख , सांगोला पोलीस ठाण्याचे राहूल देवकते , राहूल कोरे , सायबर पोलीस ठाण्याचे अन्दर अत्तार यांनी बजावली आहे .
0 Comments