google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पालेभाज्या व शेतमाल लिलाव मध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट त्वरित थांबवावी -रविंद्र कांबळे

Breaking News

पालेभाज्या व शेतमाल लिलाव मध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट त्वरित थांबवावी -रविंद्र कांबळे

 पालेभाज्या व शेतमाल लिलाव मध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट त्वरित थांबवावी   -रविंद्र कांबळे


सांगोला( प्रतिनिधी) कोरोनामुळे व सततच्या दुष्काळामुळे तसेच कीड रोगामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला असताना सांगोला तालुक्यांमध्ये नगरपालिका हद्दीमधील आठवडी बाजारामध्ये पालेभाज्या व फळांचे लिलाव केले जातात त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याकडून बेकायदेशीर व कोणतीही पावती न देता टक्केवारीची आर्थिक लूट संबंधित लिलाव करणाऱ्या दलाल व व्यापारी यांच्याकडून केली जात आहे शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे कमिशन दलाली व टक्केवारी घेता कामा नये तर लिलाव प्रक्रियेनंतर व्यापारी वर्गाकडून शासकीय नियमाप्रमाणे पैसे घेतले पाहिजे परंतु शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये दलालाकडून लूट केली जात आहे त्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत असताना कसेतरी  पीक आल्यानंतर तो विक्रीसाठी लिलावामध्ये घेऊन येतो या शेतकऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणामध्ये केली जात आहे ती लूट त्वरित थांबवावी या मागणीची तक्रार बहुजन क्रांती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी संबंधित विभागाला दिलेली आहे तरी येत्या दोन ते तीन दिवसात संबंधित विभागाने बेकायदेशीरपणे लूट करणाऱ्या दलाला वरती कारवाई करण्याची मागणी रविंद्र कांबळे यांनी केलेले आहे

Post a Comment

0 Comments