google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर आगारातून प्रवाशांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू ! शंभर टक्के कर्मचारी हजर

Breaking News

सोलापूर आगारातून प्रवाशांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू ! शंभर टक्के कर्मचारी हजर

सोलापूर आगारातून प्रवाशांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू ! शंभर टक्के कर्मचारी हजर


सोलापूर : राज्यात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांचे संपला सोलापूर विभागातील सोलापूर ब्रेक लागला आहे शुक्रवारी पाच चालक आठ वाहक कामावर रुजू झाल्याने शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर- मोहोळ, सोलापूर - नळदुर्ग व सोलापूर मंद्रूप या पाच मार्गावर एसटी प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली.


तसेच सोलापूर विभागीय कार्यालयातील शंभर टक्के कर्मचारी देखील कामावर हजर झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

महागाई भत्ता, घर भत्ता यासह एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी मागील 23 दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात सोलापूर विभागातील सोलापूर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, अकलूज, करमाळा, सांगोला, कुर्डूवाडी, मंगळवेढा या आगारातील जवळपास चार हजार 200 कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात चालक, वाहक, प्रशासकीय, यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


 मात्र बुधवारी राज्य सरकार व एसटी कर्मचारी प्रतिनिधी यांच्यातील संवाद जवळपास अयशस्वी ठरला असताना सोलापूर आगारातील पाच चालक व आठ वाहक कामावर रुजू झाल्याने सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपाला पहिला ब्रेक लागला आहे. या कर्मचाऱ्यांनी सोलापूर मोहोळ या मार्गावर तीन तर सोलापूर नळदुर्ग, सोलापूर मंद्रूप या मार्गावर प्रत्येकी एक-एक एसटीची फेरी झाल्याने प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याबरोबरच सोलापूर विभागीय कार्यालयातील 132 कर्मचारी तर कार्यशाळेतील 125 कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


ठळक बाबी....

  • आठ आगारातील प्रवासी वाहतूक सेवा ठप्पच

  • पहिल्याच दिवशी एसटीच्या पाच फेऱ्या

  • 350 किलोमीटरचा प्रवास

  • एकूण 150 प्रवाशांनी केला प्रवास

  • 7 ते 8 हजारांचे मिळाले उत्पन्न

राज्य सरकार व कर्मचारी प्रतिनिधी यांच्यात अनेक वेळा चर्चा झाली असून, यामध्ये राज्य सरकारने पगार वाढ करण्याचे जाहीर केले आहे. यातून कर्मचाऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने राज्य सरकारच्या पगार वाढीवर अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे शुक्रवारी दिसून आले.


"जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत त्यांच्यामार्फत ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू करण्यात आली आहे. जशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढेल त्याप्रमाणे पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात येईल."

- दत्तात्रय कुलकर्णी, आगार व्यवस्थापक, सोलापूर

Post a Comment

0 Comments