google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 233 बस रस्त्यावर ! कोणकोणत्या मार्गावर सुरू आहे एसटी , जाणून घ्या

Breaking News

233 बस रस्त्यावर ! कोणकोणत्या मार्गावर सुरू आहे एसटी , जाणून घ्या

 233 बस रस्त्यावर ! कोणकोणत्या मार्गावर सुरू आहे एसटी , जाणून घ्या


सोलापूर : एसटी महामंडळाच्या  विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेले बहुतेक कर्मचारी  अजूनही कामावर आलेले नाहीत. परंतु, पगारवाढीनंतर बहुतेक कर्मचारी आता कामावर हजर झाले आहेत. महामंडळाकडील 233 बस गाड्या दुपारी 12 वाजेपर्यंत विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत.


कोल्हापूर- इचलकरंजी, कोल्हापूर- इस्लामपूर, कोल्हापूर- गारगोटी, कोल्हापूर- सांगली, कोल्हापूर- कोडोली, कोल्हापूर- स्वारगेट, सांगली- पुणे, सांगली- कोल्हापूर, सांगली- विटा, सांगली- इचलकरंजी, सांगली- नाईकबा, सांगली-वाळवा, सांगली- औदुंबर, सांगली- डिग्रज, सांगली- समडोळी, सांगली- मिरज, सांगली- मानमोडी, सांगली- कागवाड बॉंड्री, सांगली- यशवंतनगर, मिरज- स्वारगेट, मिरज- सलगरे, मिरज- कोल्हापूर, मिरज- खटाव, मिरज- सातारा, मिरज- इचलकरंजी, यासह नाशिक विभागाच्या नाशिक आगाराच्या बसेस पुढील मार्गावर रवाना झाल्या आहेत : नाशिक- धुळे, नाशिक -त्रिंबक, नाशिक -कसारा, नाशिक -नांदुरी, नाशिक -हरसूल, नाशिक -बोरिवली, नाशिक -शिवणगाव, नाशिक- निफाड यासह इस्लामपूर, विटा, तासगाव, शिराठा, पलूस, या मार्गावरील 177 बस गाड्या धावू लागल्या आहेत.


तसेच मुंबई- दादर- पुणे स्टेशनपर्यंत, ठाणे, नाशिक, पालघर, सातारा, सांगली येथून एसटी बस धावू लागल्या आहेत. सातारा- स्वारगेट, सातारा- कराड- स्वारगेट ही बस धावत आहे. दापोली- चिपळूण येथून 20 बसगाड्या मार्गावर धावत आहेत. गुहागर, देवरुख, रत्नागिरी, लांजा, राजापूर, मंडणगड येथूनही काही बस धावत आहेत. महाडवरून सांदोशी, पनवेल, पुणे, निजापूर, खुटील, मोरेवाडी, मुमुरशी, दापोली, ओंबळी, बागळेवाडी, वारंगी, गुजरकोंडा, पदाचाकोंड, पेण-खोपोली, नागोठणे, पेण-पनेवल, श्रीवर्धन- माणगाव, कुंबळे- नागोठणे, पेण- पनवेल, रोहा, पुनाडेवाडी, कोरखंडा, कोर्सेखोल, गोवले, माणगाव येथूनही बस गाड्या धावत आहेत.


कामावर येण्यासाठी आज शेवटचा अल्टिमेटम

24 ऑक्‍टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरणासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, हा विषय समितीमार्फतच सोडविला जाईल, असे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, या हेतूने त्यांची पगारवाढ करून वेतनाची हमी दिली आहे. तरीही कामगार आंदोलनावर ठाम असल्याने त्यांना कामावर हजर राहण्यासाठी आज (शनिवार) शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सध्या जवळपास 15 ते 20 हजार कर्मचारी कामावर हजर झाले असून, 233 बसगाड्या सध्या विविध मार्गांवर धावत आहेत. जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यापैकी रोजंदारी कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. तर नियमित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सोलापूरचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments