नगराध्यक्षा व प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे संविधान दिन साजरा करण्यास दिरंगाई, संतप्त नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी नगरपरिषदेला ठोकले टाळे
सांगोल्यातील धक्कादायक घटना
सांगोला/प्रतिनिधी : संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर, १९४९.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर्ष साजरे केले जात असताना त्यांच्या सन्मानासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
परंतु सांगोला नगरपरिषदेने धक्कादायक प्रकार केलेला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार नगर परिषदेमध्ये शासकीय नियमाप्रमाणे संविधान दिन साजरा केला जातो. परंतु कर्मचाऱ्यांनी सर्व नियोजन केले असता नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून दिरंगाई केल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवरून नगरपरिषदेचे नगरसेवक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस तसेच नगरसेवक माननीय सुरज दादा बनसोडे यांना ही घटना सांगितली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या समवेत
त्यांनी नगर परिषदेकडे धाव घेतली व नगर परिषदेने संविधान दिन साजरा करण्यास टाळाटाळ केली म्हणून अधिकाऱ्यांना धारेवर धरले व विचारणा केली त्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा च्या दिरंगाईमुळे कार्यक्रम यावेळेपर्यंत साजरा झाला नाही याबाबतची माहिती नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांना सांगितली. आणखीन वेळ जाण्यापेक्षा तुम्ही कार्यक्रम साजरा करण्याची विनंती केली त्यानंतर नगरपरिषदेचा व नगराध्यक्षांचा व नगरसेवकांचा निषेध व्यक्त करुन नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी नगरपरिषदेला टाळे (कुलूप) ठोकले अशा घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
सदर कर्मचाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे चे वाचन करून खऱ्या अर्थाने सविधान दिन साजरा केलेला आहे.
त्यामुळे नगरपरिषदेने दिरंगाई व टाळाटाळ केल्यामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मान्यवरांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर नगरसेवक सुरज (दादा) बनसोडे यांनी तत्परता दाखवून संविधान दिन साजरा केल्यामुळे नागरिकाकडून त्यांचे आभार मानले जात आहे. वास्तविक पाहता नगराध्यक्षा ह्या या पदावर संविधानामुळेच बसल्या आहेत. शिवाय सर्व नगरसेवक व नगरसेविका हे संविधानामुळेच नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आले आहेत. पण त्यांना संविधानाचा वीसर पडला हीच सर्वात मोठी शोकांतिका सांगोला शहरातील एखाद्या कामाचे उद्घाटन किंवा नाम फलक लावायचा असेल तर नगराध्यक्षा नगरसेवक व नगरसेविका हे कार्यक्रम एक तास अगोदर येऊन बसतात परंतु याच कार्यक्रमाला साधी उपस्थिती सुद्धा दाखवली नाही. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. सदर सारखे घटना इथून पुढे घडू नये याची प्रशासनाने व पुढाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी केले आहे.
0 Comments