google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

Breaking News

मोठी बातमी! तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

 मोठी बातमी! तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या लढ्याला यश 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत.  त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत असून, आज देव दिवाळीचं प्रकाशपर्व आहे आणि आज गुरुनानक यांचं पावन प्रकाश पर्व आहे. आज मी यासंदर्भात सर्वांना शुभेच्छा देतो. दीड वर्षानंतर कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाला आहे. गुरुनानक यांनी संसारात सेवेचा मार्ग अवलंबल्यास जीवन यशस्वी होतं, असं यावेळी मोदी म्हणाले. आमचं सरकार सेवा भावनेतून देशवासियांचं जीवन सुलभ बनवण्यास कटिबद्ध आहे. गेल्या अनेक पिढ्या स्वप्न पाहत होती ती स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत.


देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिलं.देशातील शंभरमधील 80 शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षा अधिक आहे. छोट्या जमिनीच्या सहाय्यानं ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. हे अनेक लोकांना माहिती नाही. देशातील छोट्या शेतकऱ्यांसमोरील आव्हानं दूर करण्यासाठी बियाणं, विमा आणि बाजारपेठ यावर सर्व बाजूनं कामं केलं, असं मोदी म्हणाले. आज पंतप्रधान उत्तर प्रदेशातील महोबा येथे सिंचनाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’साठी झाशीला जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments