google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्ह्यात तब्बल 'एवढी' मयत मतदारांची संख्या आली समोर ; तर 49 तृतीयपंथी मतदारांनी केला अर्ज

Breaking News

जिल्ह्यात तब्बल 'एवढी' मयत मतदारांची संख्या आली समोर ; तर 49 तृतीयपंथी मतदारांनी केला अर्ज

 जिल्ह्यात तब्बल 'एवढी' मयत मतदारांची संख्या आली समोर ; तर 49 तृतीयपंथी मतदारांनी केला अर्ज


सोलापूर : आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. 28 नोव्हेंबर पर्यंत आलेल्या हरकती व दावे 20 डिसेंबर रोजी निकालात काढण्यात येणार आहेत तर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.


मतदार जनजागृती करणेकामी  सोलापूर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर मंदिर, बार्शी मधील भगवंत मंदिर, अक्कलकोट मधील स्वामी समर्थ मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर या प्रसिद्ध मंदिरामध्ये रांगोळीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली आहे.


तृतीयपंथी व देह विक्री करणा-या महीलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता विशेष प्रयत्न करून त्यांच्या करीता काम करणा-या संस्थेच्या मार्फत मतदान नोंदणी करणेसाठी जागृती करण्यात आली असून तृतीयपंथीच्या गुरु समवेत व देह विक्री करणाऱ्या स्त्रियासमवेत बैठका घेण्यात आल्या. त्या अनुषंगाने दि. १३ व १४.११.२०२१ रोजीच्या विशेष मोहीमेमध्ये उत्तर सोलापूर, पंढरपूर, टेभुंर्णी, माढा व बार्शी या ठिकाणी तृतीयपंथी व देह विक्री करणा-या स्त्रीयासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये ४९ तृतीयपंथी मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत.


जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी उपस्थित राहून ग्रामसभेचे महत्व विषद करून सदर ग्रामसभा यशस्वीपणे राबविणेसाठी सर्व पदाधिकारी, प्रशासन अधिकारी व सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना सहकार्य करणेबाबत अवाहन केले. सर्व तालुक्याच्या मुख्यालयाच्या मोक्याच्या जागेवर पोस्टर्स, बॅनर्स, होडींगद्वारे प्रसिध्दी देण्यात आली. ग्रामीण भागामध्ये रिक्षा, जीप व ग्रामपंचायतीचे स्पीकरवरून ग्रामसभेबाबत जाहीर दवडी देण्यात आली. अश्याप्रकारे सदर ग्रामसभा दि. १६.११.२०२१ रोजी होणार असलेबाबत जिल्हयामध्ये मोठ्याप्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली.


सदर ग्रामसभा यशस्वीपणे राबविणेकामी ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये २ पेक्षा जास्त मतदान केंद्राचा समावेश आहे अश्या विशेष ग्रामसभा या यशस्वीपणे राबविणेकामी वर्ग-१ च्या अधिकारी यांची निरिक्षक म्हणून प्रत्येक तालुक्याकरीता एक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तसेच इतर सर्व ग्रामसभेस भेट देणेकामी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व वरिष्ठ वेतन श्रोणी अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात ग्रामसभा निहाय प्राप्त झालेल्या माहितीनुसार....... 

मयत मतदार संख्या -41789, कायम स्थलांतरित मतदार संख्या -3571, लग्न होऊन बाहेर गेलेली संख्या-4036, लग्न होऊन गावात आलेली संख्या -3517, एक जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण संख्या 8139, दिव्यांग मतदार चिन्हांकित संख्या-4922, एका भागापेक्षा अधिक भागात नाव असलेली संख्या-1622, तांत्रिक चुका असलेली संख्या-2801

Post a Comment

0 Comments