google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यार्थ्यांनो ! सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्टीत वाढ आता ' या ' तारखेपर्यंत असणार सुट्टी

Breaking News

विद्यार्थ्यांनो ! सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्टीत वाढ आता ' या ' तारखेपर्यंत असणार सुट्टी

 विद्यार्थ्यांनो ! सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्टीत वाढ आता ' या ' तारखेपर्यंत असणार सुट्टी


शाळांच्या सुट्याबाबत सुरू असलेला वाद शुक्रवारी मिटला. मुख्याध्यापक संघाबरोबर केलेल्या चर्चेनंतर शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी इतर जिल्ह्याप्रमाणे दिवाळीची सुटी २० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे जाहीर केले.शाळांच्या दिवाळी सुट्यांबाबत शिक्षण विभागाने वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.


इतर जिल्ह्यांनी दिवाळीची सुटी १९ नोव्हेंबरपर्यंत वाढविली, तर सोलापूर जिल्ह्यातील शाळा ११ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.


शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सर्वेक्षण जिल्ह्यातील शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुटी जाहीर केली होती.


दि.१२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपादणूक ( एनएएस ) परीक्षा असल्याने ११ नोव्हेंबरपासून सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिले होते.


ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ही परीक्षा पार पडली. त्यानंतर मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी बाबर यांची भेट घेतली. इतर जिल्ह्याप्रमाणे सुटी वाढवून देण्याची विनंती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments