google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नात्याने चुलत जावा असलेल्या महिलांनी एकमेकींच्या पती विरोधात बलात्काराची केली तक्रार -

Breaking News

नात्याने चुलत जावा असलेल्या महिलांनी एकमेकींच्या पती विरोधात बलात्काराची केली तक्रार -

 नात्याने चुलत जावा असलेल्या महिलांनी एकमेकींच्या पती विरोधात बलात्काराची केली तक्रार - 


विचित्र घटना

काही अश्या विचित्र घटना घडतात की आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही. आता हेच पाहा ना  !  नात्यात एकमेकींच्या चुलत जावा असलेल्या महिलांनी परस्परांच्या पती विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दोघांच्या नवऱ्यासह चार लोकांना अटक केली आहे. नात्यातील दोन महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दिली आहे. पुणे जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजगड पोलीस ठाण्यात दोन गटातील चार जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी चारही जणांना अटक करण्यात आली आहे.


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बलात्काराचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या विचित्र घटनेमध्ये राजगड पोलिसांनी दोन गटातील चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नात्याने एकमेकींच्या चुलत जावा असलेल्या दोन पीडित महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.


यामध्ये एका पीडित महिलेने तिघा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 दरम्यान भोर तालुक्यातील संबंधित पीडित महिलेच्या शेतामध्ये घडल्याचा दावा केला जात आहे.


शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यास गेलेल्या या महिलेचा तिच्या चुलत दिराने विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन सहकाऱ्यांसोबत संगनमत करून गोठ्यामध्ये प्रवेश केला आणि गोठ्याच्या दरवाजाला आतून कडी लावत आळीपाळीने बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित महिलेने राजगड पोलिसांकडे दिली.


यावरून राजगड पोलिसांनी संबंधित तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे संबंधित आरोपीच्या पत्नीनेही बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात दाखल केला आहे.


यामध्ये 31 वर्षीय मजुरी करणाऱ्या संबंधित पीडितेने कापूरहोळ येथील एका लॉजवर आणि पीडितेच्या राहत्या घरी ऑक्टोबर 2020 पासून 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास राजगड पोलिस करत असून वरील चारही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकायांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments