google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना काळात ' चाईल्ड लाइन'ने रोखले 100 बालविवाह !

Breaking News

कोरोना काळात ' चाईल्ड लाइन'ने रोखले 100 बालविवाह !

 कोरोना काळात ' चाईल्ड लाइन'ने रोखले 100 बालविवाह !


शहरातील चाईल्ड लाइन संस्थेकडून मागील दोन वर्षांच्या काळात जवळपास 607 बालकामगार मुलांची सुटकाही करण्यात संस्थेला यश मिळाले आहे.


सोलापूर : शहरात कार्यरत असलेल्या चाईल्ड लाइन  1098 या संस्थेच्या माध्यमातून जवळपास दोन वर्षांच्या कालावधीत अर्थात कोरोना काळात 100 बालविवाह  रोखण्यात यश मिळाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. शहरातील चाईल्ड लाइन संस्थेकडून मागील दोन वर्षांच्या काळात जवळपास 607 बालकामगार मुलांची सुटकाही करण्यात संस्थेला यश मिळाले आहे.सोलापूर चाईल्ड लाइन 1098 ही संस्था बालकांसाठी काम करते. सोलापूर रेल्वे स्थानकावर देशाच्या कानाकोपऱ्यांतील रेल्वे गाड्यांची ये-जा असते. त्यात कोरोना काळात गाड्या बंद असल्याने रेल्वे स्थानकात मुले हरविण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी बालविवाहाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात तसेच शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. त्यातच मागील दोन वर्षांत कोरोना काळात 100 बालविवाह रोखण्याचे काम संस्थेच्या टीमकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बालगृह, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, बालकल्याण समिती आदींशी समन्वय ठेवत चाईल्ड लाइनचे काम चालते. संस्थेचे प्रमुख उल्हास पाटील, संचालिका सपना चिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक आनंद ढेपे आणि नऊ जणांची टीम सामाजिक दायित्वातून काम करत आहे.


शहरातील झोपडपट्ट्या तसेच अविकसित भाग असलेल्या नगरांतील मुले मोठ्या प्रमाणात हॉटेल, गॅरेज, रुग्णालय आदी ठिकाणी कामाला आहेत. तसेच काही जणांकडून पालकच भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करून घेतात. अशा पालकांची भेट घेऊन त्या मुलांना बालकामगार शाळेत पाठविण्यात येते. तर बालकामगार पालकांचे समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.


मागील दोन वर्षात संस्थेच्या माध्यमातून 607 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. तर आठ जणांना तात्पुरत्या स्वरूपात संस्थेकडून निवारा देण्यात आला असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यामध्ये बालविवाह बचावापासून ते भिक्षेकरी असलेल्या बालकांस परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येते. कोरोना काळात जवळपास 100 बालविवाह संस्थेच्या माध्यमातून रोखण्यात आले आहेत. तर 600 बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम संस्थेच्या टीमकडून करण्यात आले आहे.

- आनंद ढेपे, जिल्हा समन्वयक, चाईल्ड लाइन

Post a Comment

0 Comments