google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एक - दोन गुंठ्यांची दस्तनोंदणी नाहीच ! मंजूर लेआउटमधील असेल तरच कायदेशीर

Breaking News

एक - दोन गुंठ्यांची दस्तनोंदणी नाहीच ! मंजूर लेआउटमधील असेल तरच कायदेशीर

एक - दोन गुंठ्यांची दस्तनोंदणी नाहीच ! मंजूर लेआउटमधील असेल तरच कायदेशीर


  समजा एखाद्या सव्हें नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे . त्याच सव्हेंबरमधील तुम्ही दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल तर त्यांची दस्तनोंदणी होणार नाही . मात्र , त्याच सव्र्व्हे नंबरचा ले - आउट मंजूर असेल आणि त्यामध्ये दोन गुंठ्यांचे तुकडे पाहून त्यास जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले आउटमधील दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्तनोंदणी होऊ शकणार आहे . जिल्हाधिकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले - आउट मधील एक दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची यापुढे दस्त नोंदणी होणार आहे . याबाबतचे परिपत्रक नोंदणी व मुद्रांक विभागाने सोमवारी काढले आहे .


 या निर्णयामुळे बेकायदा जमिनीचे तुकडे करून एक दोन गुंठे जमिनीची विक्री करण्याचा प्रकार बंद होणार आहे . गेल्या काही वर्षामध्ये जमिनीचे तुकडे करून , त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत . अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे . तरीदेखील असे व्यवहार महसूल होत असून , त्यांची दस्तनोंदणीदेखील होत आहे . मध्यंतरी राज्य सरकारने या संदर्भात चौकशीचे आदेश नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दिले होते . या चौकशीत असे अनेक प्रकार झाले असल्याचे निदशर्नस आले होते . त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अशा दस्तांची नोंदणी करण्याचे बंद केले होते . राज्य सरकारच्या महसूल विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला पत्र पाठवून कायद्यातील तरतुदी काय आहेत , हे पुन्हा एकदा कळवले आहे


 सर्व  दुय्यम निबंधक यांनी या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि दस्तनोंदणी करताना अनियमितता होणार नाही , याची दक्षता घ्यावी . अशा प्रकारे दस्तनोंदणी करताना अनियमितता केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल . याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे . -श्रावण हर्डीकर , नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

Post a Comment

0 Comments